Cristiano Ronaldo : फुटबॉल स्टार रोनाल्डोवर एका सामन्याची बंदी

सौदी अरेबियातील लीग दरम्यान असभ्य हावभाव केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. 

133
Cristiano Ronaldo : फुटबॉल स्टार रोनाल्डोवर एका सामन्याची बंदी
  • ऋजुता लुकतुके

सौदी अरेबियातील लीगमध्ये खेळताना असभ्य हावभाव केल्याप्रकरणी सौदी फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तपालन समितीने ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) एका सामन्यासाठी बंदी घातली आहे. अल नासर हा रोनाल्डोचा लीग संघ विरुद्ध अल शबाब असा हा सामना रंगला होता. आणि अल नासरने तो ३-२ असा जिंकला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर रोनाल्डोचा प्रेक्षकांकडे पाहून केलेल्या विचित्र हावभावांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. (Cristiano Ronaldo)

यात सामना जिंकल्यानंतर प्रतिस्पर्धी अल शबाब संघाच्या पाठीराख्यांकडे पाहत रोनाल्डो कानाला हात लावून ते काय म्हणतायत हे ऐकण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आपले दोन्ही पाय फाकवून तो त्यांना ललकारतानाही दिसतो. ही कृती त्याने वारंवार केली आहे. प्रेक्षकांकडून मेस्सीच्या नावाचा गजरही आपल्याला ऐकायला मिळतो. (Cristiano Ronaldo)

(हेही वाचा – Anurag Thakur : ‘देशातील ॲथलीटना देणार डिजिटल कार्ड,’ – अनुराग ठाकूर)

रोनाल्डोला सौदी फुटबॉल फेडरेशनला द्यावा लागणार इतका रियाल दंड 

अर्जेंटिनाचा लायनेल मेस्सी हा रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील जुना प्रतिस्पर्धी आहे. आणि त्याचं नाव ऐकूनच रोनाल्डो खवळला असावा. पण, त्याच्या या असभ्य वर्तनामुळे एका सामन्याची बंदी त्याच्यावर लादली गेली आहे. (Cristiano Ronaldo)

या बंदीबरोबरच रोनाल्डोला सौदी फुटबॉल फेडरेशनला १०,००० रियाल तर अल शबाब क्लबला २०,००० रियाल दंड म्हणून द्यायचे आहेत. शिस्तभंगाच्या सुनावणीचा खर्च म्हणून ही रक्कम त्याच्याकडून घेतली जाणार आहे. इतकंच नाही तर हा निर्णय अंतिम असून रोनाल्डोला त्याविरुद्ध दाद मागता येणार नाही, असंही शिस्तपालन समितीने स्पष्ट केलं आहे. (Cristiano Ronaldo)

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातही रोनाल्डोवर अशीच कारवाई झाली होती. अल नासर क्लबने अल हिलाल संघाविरुद्धचा सामना ०-२ ने गमावल्यावर पराभव सहन न होऊन ३९ वर्षीय रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) असेच हावभाव केले होते. त्यानंतरचा हा दुसरा गुन्हा म्हणून त्याच्यावर बंदीची कारवाई झाली आहे. (Cristiano Ronaldo)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.