Diwali Firecrackers : रात्री दहा नंतरही मुंबईत फटाके फोडले, मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्कमध्ये उशिरापर्यंत आवाजाने गाठली ‘इतक्या’ डेसिबल पर्यंत पातळी

मुंबईत रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्यास न्यायालयाने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात न्यायालयाच्या निर्देशाला पायदळी तुडवून रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.

58
Diwali Firecrackers : रात्री दहा नंतरही मुंबईत फटाके फोडले, मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्कमध्ये उशिरापर्यंत आवाजाने गाठली 'इतक्या' डेसिबल पर्यंत पातळी
Diwali Firecrackers : रात्री दहा नंतरही मुंबईत फटाके फोडले, मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्कमध्ये उशिरापर्यंत आवाजाने गाठली 'इतक्या' डेसिबल पर्यंत पातळी
मुंबईत रात्री ८ ते १० या वेळेत फटाके वाजवण्यास न्यायालयाने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात न्यायालयाच्या निर्देशाला पायदळी तुडवून रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. सन २०२० पासून मागील तीन वर्षात कमी प्रमाणात वाजलेल्या फटाक्यांच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आवाजात फटाक्यांची आतषबाजी झालेली पाहायला मिळाली. यामध्ये मरीन ड्राईव्ह येथे सर्वाधिक आवाजाची फटाक्यांची आतषबाजी झाली असून त्या खालोखाल दादर छत्रपती महाराज शिवाजी पार्कमध्ये मोठ्या आवाजाचे फटाके फोडलेले आहेत, अशी नोंद आवाज फाउंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले. (Diwali Firecrackers)
मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे वायूप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी आहे. त्यामुळे यंदा न्यायालयाच्या निर्देशाचे दिल से पागल होईल असा अंदाज होता आणि न्यायालयाच्या निर्देशात योग्य प्रकारे अंमलबजावणी पोलीस आणि इतर यंत्रणांकडून केली जाईल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके फोडण्याचे निर्देश असताना, त्यानंतरही फटाके फोडण्यात आले. यामध्ये मरीन ड्राईव्ह आणि दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे भाग सर्वाधिक आघाडीवर असल्याचे अहवालातून समोर आले आहे. ‘आवाज फाउंडेशन’च्या मदतीने आवाजाची मर्यादा मापण्याचे काम केले जाते आणि या संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या दिनी विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीचे आवाजाचे नोंद घेण्यात येते. त्यात ही बाब निदर्शनास आली. (Diwali Firecrackers)
यंदा मोठ्या आवाजातील फटाक्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष वापराच्या ठिकाणी डेसिबल पातळी वाढवली. आवाज फाउंडेशनच्या अहवालातील नोंदीनुसार, मरीन ड्राईव्हवर रात्री ९ वाजेपूर्वी काही फटाके वाजवले जात होते. रात्री ९ वाजल्यानंतरही मरीन ड्राइव्हवर फटाके फोडण्यात येत होते. रात्री ९.५५ वाजता मरीन ड्राईव्ह येथे आकाशातील बॉम्ब  फोडले गेले. त्याच वेळी सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदवली गेली. रात्री १०.१० च्या सुमारास पोलिसांनी फटाके बंद करण्यास सुरुवात केली. त्यावेळी  त्यांनी काही लोकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मज्जाव केल्यानंतरही त्यांना न जुमानता फटाके फोडले जात होते. दिवाळीनंतर लगेचच हवा प्रदूषणात वाढ होत असते. या फटाक्यांमुळे हवेत बेरियमसह ही हानिकारक रसायने मिसळली जातात. त्यामुळे ही प्रदूषित हवा अजूनच हानिकारक बनते. (Diwali Firecrackers)
२०२३ मध्ये एम पी सी बी आणि आवाज फाउंडेशन यांनी दिवाळीपूर्वी उपलब्ध फटाक्यांच्या आवाजाची पातळी निर्धारित करण्यासाठी त्यांनी संयुक्तपणे फटाक्यांच्या आवजाची पातळी मोजण्याचा प्रयत्न करत असतात. सन २०२१ च्या दिवाळीत शिवाजी पार्कमध्ये सर्वात जास्त आवाजाची पातळी म्हणजे १००.४ डेसिबल एवढी होती, कारण त्यात ‘ग्रीन क्रॅकर्स’चा वापर जास्त होता. तर सन २०२२ च्या दिवाळीत मरीन ड्राइव्ह येथे सर्वाधिक आवाजाची पातळी म्हणजे १०९.१ डेसिबल एवढी होती. तर सन २०२३ च्या दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिनी ७.४५ ते ८.४५ या वेळेत शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह परिसरात जे फटाके फोडले गेले त्यांचा आवाज ८५ डेसिबल एवढा नोंदवला गेला. (Diwali Firecrackers)
तर ९ ते ११.२५ या वेळेत मरीन ड्राईव्ह भागात हे फटाके फोडले गेले त्यांच्या आवाजाची नोंद ८२ ते११७ एवढी नोंदवली गेली. विशेष म्हणजे त्यावेळी तिथे पोलीस उपस्थित होते आणि आपण त्यानंतर रात्री १०.०५ ला पोलिसांना याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना फटाके वाजविण्यास अटकाव करण्यास सुरुवात केली असे आवाज फांडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. तर रात्री पावणे बारा वाजता शिवाजी महाराज पार्कमध्ये फटाके वाजविण्यात येत होते आणि त्यावेळी फटाक्यांच्या आवाजाची पातळी ही ८५ डेसिबल एवढे होते. असे या अहवालात म्हटले आहे. (Diwali Firecrackers)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.