काँग्रेस सोन्याचा महाल बनवण्याचे आश्वासन देईल; पण सोने बटाट्यापासून बनवणार का?; PM Narendra Modi यांची टीका,

88

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी आता केवळ 2 दिवसच शिल्लक आहेत. मात्र असे असले तरी, मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या बटाट्यांपासून सोने तयार करण्यासंदर्भातील वक्तव्याचा उल्लेख करत, त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते बडवानी येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते.

17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. याच्या दोन दिवस आधी अर्थात 15 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता, निवडणूक प्रचार थांबेल. मध्य प्रदेशातील खुर्चीसाठी काँग्रेस लोकांना सोन्याचा महाल देण्याचे आश्वासनही देऊ शकते. आता ते सोने  कोणते आणतील? बटाट्याचं? काही सांगता येत नाही, ते आता म्हणतील, सोन्याचा महाल देऊ आणि नंतर म्हणतील, बटाट्यापासून सोनं काढू, मग देऊ, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा INDI आघाडीत बिघाडी? तिसऱ्या आघाडीची तयारी…)

भाजपच्या संकल्प पत्रात आपल्याला देण्यात आलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण होईल,  जेथे जेथे काँग्रेस सरकार येते, तेथे-तेथे गुन्हेगारी वाढते, दंगली होतात, महिलांसंदर्भातील गुन्हे वाढतात, सण-उत्सव साजरे करणेही अवघड होते. काँग्रेसच्याच शासनात वीरांची भूमी असलेल्या राजस्थानात ‘भारत तेरे टुकडे होंगे’ सारख्या घोषणा दिल्या गेल्या. आम्हाला राजस्थान तर वाचवायचाच आहे, पण मध्यप्रदेशही कुशासनाच्या हाती जाण्यापासून रोखायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.