Accident : लातूरमध्ये भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

161

लातूरमधून भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारची ऊसाच्या ट्रॅक्टरशी जोरदार धडक झाली. या अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात ही घटना घडली आहे.

दरम्यान, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हे चार तरुण निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृत्युमुखी पडलेले चार चौघे नांदेडमधील रहिवासी आहेत. चौघांच्याही मृत्यूने कुटुंबियासह मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.  चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली, तेव्हा कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कारने समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक (Accident) दिली. तर चारही तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके आणि नर्मन कात्रे अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या अपघातात (Accident) ऊसाच्या ट्रॉलीचे देखील मागील बाजूने नुकसान झाले. तर अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.