स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविणार; पर्यावरण मंत्री Pankaja Munde यांची घोषणा

194
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 राबविणार; पर्यावरण मंत्री Pankaja Munde यांची घोषणा

पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे. राज्यस्तरावर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्यानंतर आता 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 याकालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. (Pankaja Munde)

(हेही वाचा – ‘जर कुणी आम्हाला डिवचले तर…’; उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री Keshav Prasad Maurya यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल)

निसर्गाच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रीत करुन वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यास सुरुवात करण्यात आली. निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध शासकीय योजना, कार्यक्रम, उपाययोजना एकत्रित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे व मिशनमोड पद्धतीने राबविण्यासाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच टप्प्यात माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी झाली आहे. (Pankaja Munde)

(हेही वाचा – Ind vs Eng, Rishabh Pant : रिषभ पंतचा नवीन विक्रम; महेंद्रसिंग धोनीला टाकलं मागे)

राज्यातील 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार अंमलबजावणी

माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व 27895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहाय गट करून स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) तयार करण्यात आला असून त्यावर 15 जुलै 2025 पर्यंत सूचना/अभिप्राय मागविण्यात आले आहे. त्या सूचनांचा विचार करुन अभियान मार्गदर्शन प्रारुप संच (टूलकिट) अंतिम करण्यात येणार आहे. (Pankaja Munde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.