Iran – Israel War मध्ये इस्त्राईल मागील ५-६ दिवस इराणवर बॉम्ब वर्षाव करत आहे, पण इराणच्या जमिनीत ३०० फूट खोलवर असलेल्या अणू केंद्राला जराही धक्का बसत नाही. हे पाहिल्यावर हतबल झालेल्या इस्राईलच्या मदतीसाठी आता अमेरिका प्रत्यक्ष युद्धात उतरण्याच्या तयारीत आहे. यामुळे आता अमेरिकेची सर्वात शक्तीशाली मानली जाणारी ६ बी-2 बॉम्बर विमाने देखील मध्य पूर्वेच्या दिशेने झेपावली आहेत. अमेरिकेचे बंकर-बस्टर बॉम्ब ही विमाने टाकू शकतात.
आता अमेरिकेतून या विमानांनी एवढ्या मोठ्या संख्येने झेप घेतल्याने इराणवरे अमेरिकेचा हल्ला (Iran – Israel War) आता निश्चित मानला जात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि ऑडिओ कम्युनिकेशन्सनुसार अमेरिकेतील मिसूरी येथील व्हाइटमन एअर फोर्स बेसवरून ग्वाममधील यूएस एअर फोर्स बेसवर ही विमाने जाताना दिसली आहेत. फॉक्स न्यूजने याचे वृत्त दिले आहे. मिसूरीहून उड्डाण केल्यानंतर या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी पॅसिफिक महासागरावर हवेतच इंधन भरले. विमानात मोठा पेलोड असल्याने जास्त इंधन न घेताच ही विमाने झेपावली होती. यामुळे या विमानांमध्ये बंकर-बस्टर बॉम्ब असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बी-२ स्टील्थ फायटर विमान एकावेळी दोन बंकर बस्टर बॉम्ब घेऊन जाऊ शकते.
(हेही वाचा Iran Israel Conflict : इस्रायलच्या हल्ल्यात आणखी एका भयानक इराणी कमांडरची केली हत्या, कोण आहे ‘तो’ कमांडर?)
सध्यातरी केवळ अमेरिकेकडेच हे बॉम्ब आहेत. अणुस्थळ फोर्डोला हेच बॉम्ब नष्ट करू शकतात. परंतू त्यासाठी सातत्याने बॉम्बफेक करावी लागणार आहे. यामुळे अमेरिकेने दोन ते तीन विमानवाहू युद्धनौका इराणच्या दिशेने पाठविल्या आहेत. (Iran – Israel War) तसेच ३० हून अधिक इंधनवाहू विमाने देखील पाठविली आहेत. हा एवढा तामझाम इराणला घाबरवण्यासाठी तर नक्कीच नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आतादेखील अणुकरारावर स्वाक्षरी करू शकतो, परंतू कमी वेळ उरला असल्याचे वक्तव्य केले होते.
Join Our WhatsApp Community


