Chennai Cyclone : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे चैन्नई रन वे वर पाणीच पाणी, प्रवाशांचे हाल

210
Chennai Cyclone : 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा चैन्नई रन वे वर पाणीच पाणी, प्रवाशांचे हाल

आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरी या समुद्र किनारी आकाशात ढग दाटून आले आहेत. अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस गेल्या ३-४ दिवसांपासून सुरू आहे. मिचाँग चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने अलर्ट जारी केला असून सर्वसामान्यांना सावध आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. तुफान पावसानं चेन्नईच्या किनारपट्टीवरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. (Chennai Cyclone)

पावसामुळे चेन्नई एअरपोर्ट (Chennai Airport) रनवेवर सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे विमान उड्डाणसेवा विस्कळीत झाली आहे. सध्या चक्रीवादळ चेन्नईपासून जवळपास १५० किमी, नेल्लोरपासून २५० किमी, बापटहून ३६० किमी, मछलीपट्टनमहून ३८० किमी दूर आहे. मात्र समुद्र किनारी भागाला वादळाचा फटका बसत असून प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय हवामान खात्याने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ ‘मिचॉन्ग’ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहोचलं आहे. या काळात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान मिचॉन्ग चक्रीवादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी, कराईकल आणि यानम भागात 4 डिसेंबरला शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा : IAF : तेलंगणात वायुदलाचं ट्रेनर विमान कोसळलं! प्रशिक्षकासह दोन वैमानिकांचा मृत्यू)

‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 90 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या राज्यांतील परिस्थितीची माहिती घेत तयारीचे आदेश दिले आहेत.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.