Rahul Dravid : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुलगा संमितच्या सामन्याला राहुल द्रविडची हजेरी

राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक तर आहेच. शिवाय त्याचा मुलगा संमितच्या क्रिकेट कारकीर्दीवरही त्याचं जवळून लक्ष असतं. 

223
Rahul Dravid : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुलगा संमितच्या सामन्याला राहुल द्रविडची हजेरी
Rahul Dravid : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुलगा संमितच्या सामन्याला राहुल द्रविडची हजेरी
  • ऋजुता लुकतुके

राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक तर आहेच. शिवाय त्याचा मुलगा संमितच्या क्रिकेट कारकीर्दीवरही त्याचं जवळून लक्ष असतं. (Rahul Dravid)

२०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. आपला मुलगा संमितचा कूचबिहार करंडकातील सामना पाहण्यासाठी ते सपत्नीक मैदानावर हजर होते. संमित या सामन्यात नाबाद १९ धावांवर खेळत आहे. कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड असा हा सामना सुरू आहे. (Rahul Dravid)

काही दिवसांतच राहुल यांना पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या सेवेत रुजू व्हायचं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ते पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील. अलीकडेच बीसीसीआयने द्रविड यांच्याबरोबरच इतर प्रशिक्षकांचे करारही वर्ल्ड टी-२० स्पर्धेपर्यंत वाढवले आहेत. आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेपासून भारतीय संघाची या स्पर्धेसाठीची तयारीही सुरू होईल. (Rahul Dravid)

पण, तोपर्यंतचा वेळ द्रविड आपल्या कुटुंबीयांबरोबर घालवत आहेत. त्यांची दोन्ही मुलं संमित आणि अव्यय क्रिकेट खेळतात आणि द्रविड वेळोवेळी त्यांच्याबरोबर सराव करतानाही दिसतात. उत्तराखंड बरोबरच्या सामन्यात अष्टपैलू संमितने आधी गोलंदाजी करताना ५ षटकं टाकली आणि यातील २ निर्घाव षटकं धरून त्याने ११ धावा दिल्या. उत्तराखंड संघ २३२ धावांच गुंडाळला गेला. (Rahul Dravid)

(हेही वाचा – Sachin Remembers Achrekar Sir : रमाकांत आचरेकरांच्या वाढदिवशी सचिनने केलं सरांचं स्मरण )

त्यानंतर कर्नाटक संघाची फलंदाजी सुरू झाली असून संमित द्रविड ५५ धावांवर नाबाद आहे. या कूचबिहार करंडक स्पर्धेत संमित चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि हिमाचलप्रदेश विरुद्ध ५५ तर दिल्लीविरुद्ध त्याने ५१ धावा केल्या होत्या. (Rahul Dravid)

संमित कर्नाटकसाठी १९ वर्षांखालील तर दुसरा मुलगा अव्यय १६ वर्षांखालील गटात खेळतो. (Rahul Dravid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.