
-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli डोंबिवली एमआयडीसीमधील काँक्रीटचे नव्याने बांधलेले रस्ते आरपार तोडायची मालिका अद्याप सुरूच आहे. सोमवारपासून डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयापासून सोनारपाडा-आईस फॅक्टरीकडून मानपाडा रोडला जोडणाऱ्या रहदारीच्या आणि महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यावरील इंडस कंपनी-अभिनव शाळेसमोर काँक्रीटीकरण केलेला रस्ता नाल्याच्या बांधकामासाठी तोडण्यास सुरूवात झाली आहे. रहदारी आणि वर्दळीचा असलेला हा रस्ता किमान एक महिना वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Dombivli)
(हेही वाचा – भारतामध्ये ‘Digital Arrest’ घोटाळ्यांशी संबंधित व्हॉट्स अॅप खात्यांवर बंदी, सुरक्षिततेसाठी नवीन फिचर्सचा पर्याय)
डोंबिवली एमआयडीसीतील जिमखाना रोडला असलेल्या एसटी स्टँडवरून कोकण-पुणे घाटमाथ्यावर जाणाऱ्या एसटी बसेस याच मार्गावरून पुढे येत-जात असल्याने त्यांना आता दुसऱ्या मार्गाने जावे लागणार आहे. याच रस्त्याच्या एका बाजूला औद्योगिक वसाहत आणि कारखाने असून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निवासी वसाहत, शाळा आणि व्यापारी गाळे आहेत. एमआयडीसी फेज दोनमध्ये यापुर्वी अमुदान आणि प्रोबेस या रासायनिक कंपन्यांमध्ये शक्तिशाली स्फोट झाले होते. विशेष म्हणजे हे स्फोट मे महिन्यातच झाले असल्याने दुर्दैवाने अशा काही दुर्घटना पुढे घडल्यास अग्निशमन दल व रूग्णवाहिका येण्यास हा महत्वाचा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने वेळ लागणार आहे. या सर्व कारणांमुळे सर्वांना याचा जबरदस्त फटका बसणार आहे. (Dombivli)
(हेही वाचा – गुटखाविक्री ते ५ हजार कोटींचे ड्रग्ज नेटवर्क; दाऊदचा हस्तक Salim Dola च्या अखेर आवळल्या मुसक्या)
एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून फेज दोनमधील अभिनव शाळेजवळ नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्याची तोडफोड सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या भागातील रहिवासी, पादचारी, वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी, पालक, आदी सर्वांची गैरसोय तर होणार आहेच, शिवाय चांगला रस्ता तोडण्यामुळे सर्वांना त्याचा नाहक भुर्दंड पडणार आहे. गटारे आणि नाल्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार की अर्धवट राहणार? हे येत्या काही दिवसांतच समजेल. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मे महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरू होण्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. (Dombivli)
(हेही वाचा – Marathi language Compulsory: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकावच लागणार, निर्णयाची अंमलबजावणी ‘या’ तारखेपासून होणार)
…अन्यथा पावसाळ्यात हाहाकार माजणार
केडीएमसीकडून नालेसफाईची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यातच नवीन नाल्याची बांधकामे जर अर्धवट राहिली तर येत्या पावसाळ्यात या परिसरात मोठा हाहाकार होऊ शकतो. याचा मुख्यत्वे फटका एमआयडीसीच्या निवासी विभागासह सांगर्ली, आजदे पाडा, आजदे गाव, आदी परिसराला बसू शकतो. एमआयडीसी आणि केडीएमसीने वेळीच खबरदारी घेऊन पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे मत या परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त केले. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
