
-
प्रतिनिधी
Ashish Shelar तुमच्या घरात असलेल्या जुन्या पोथ्या, मोडी लिपीतील पत्रे किंवा वाडवडिलांचे हस्तलिखित दस्तऐवज आता केवळ कपाटात पडून राहणार नाहीत, तर ते भारताचा जागतिक वारसा म्हणून झळकणार आहेत. महाराष्ट्राचा हा विखुरलेला ऐतिहासिक खजिना शोधण्यासाठी राज्य सरकारने ‘हर घर दस्तक’ ही विशेष मोहीम हाती घेतली असून, यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी कंबर कसली आहे. (Ashish Shelar)
(हेही वाचा – रशियाच्या S-400 प्रणालीमुळे पाकिस्तान घाबरला; भारताने आणखी पाच प्रणाली मागितल्या)
या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘ज्ञानभारती’ नावाचे अत्याधुनिक ॲप. या ॲपद्वारे राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात असलेल्या प्राचीन हस्तलिखितांची डिजिटल नोंदणी केली जाणार आहे. मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले की, ऐतिहासिक घराणी, संस्था आणि सर्वसामान्यांकडे असलेल्या या अमूल्य ठेव्याची मालकी त्यांचीच राहणार आहे; सरकार फक्त त्याचे डिजिटल जतन करून तो वारसा जगासमोर आणण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Marathi language Compulsory: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकावच लागणार, निर्णयाची अंमलबजावणी ‘या’ तारखेपासून होणार)
येत्या १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’च्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक ग्रामसभेत या विषयाचा गाजावाजा होणार आहे. पुढील सात दिवसांत तालुका आणि जिल्हा पातळीवर अशा दस्तऐवजांची यादी तयार करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे कला अकादमीत झालेल्या बैठकीत या मोहिमेचा आराखडा निश्चित करण्यात आला. ज्या कागदपत्रांना आतापर्यंत वाळवी आणि धूळ खात पडावे लागत होते, त्यांना आता डिजिटल संजीवनी मिळणार आहे. हा उपक्रम केवळ नोंदणी नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा शोध घेणारी एक मोठी चळवळ ठरणार आहे, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. (Ashish Shelar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
