Dharavi Redevlopment : सर्व धारावीकरांना घरे, अपात्र कुटुंबांना शासनाच्या भाडेतत्वावरील योजनेनुसार घरे

4326
Dharavi Redevlopment : सर्व धारावीकरांना घरे, अपात्र कुटुंबांना शासनाच्या भाडेतत्वावरील योजनेनुसार घरे
Dharavi Redevlopment : सर्व धारावीकरांना घरे, अपात्र कुटुंबांना शासनाच्या भाडेतत्वावरील योजनेनुसार घरे

विशेष प्रतिनिधी,मुंबई

धारावी विकास (Dharavi Redevlopment) प्रकल्पांमध्ये सर्व पात्र सदनिकाधारकांना धारावीमध्येच किमान ३५० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे दिली जातील, ज्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांतर्गत घरांसाठी नवीन मानक स्थापित केले जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये पात्र नसलेल्या अर्थात अपात्र असलेल्या कुटुंबांच्या सदनिकांसाठीचीही तरतूद आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेनुसार घरे उपलब्ध करून दिली जातील,असे अदानी समुहाने स्पष्ट केले. सर्व धारावीकरांना नवीन घरे मिळतील. त्यांना की-टू-की सोल्यूशन प्रदान केले जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व धारावीकरांना नवीन घरे मिळतील

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी धारावी येथील शाखा भेटींमध्ये धारावी प्रकल्पामध्ये येथील कुटुंबाला मुंबई बाहेर फेकले जाईल असा आरोप केला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या या आरोपांचे खंडन अदानी समुहाने केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लिमिटेड (DRPPL), महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आहे. पात्र असो वा नसो, सर्व धारावीकरांना नवीन घरे मिळतील. त्यांना की-टू-की सोल्यूशन प्रदान केले जाईल आणि संक्रमण शिबिरांमध्ये ठेवण्याऐवजी ते थेट नवीन घरांमध्ये जातील,असे अदानी समुहाने स्पष्ट केले.

(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : वीर सावरकरांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी नाशिकमधील तरुणांचा अनोखा उपक्रम)

निविदेच्या अटी व शर्ती पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच

पक्षपाताचा दावा पूर्णपणे निराधार असून, अदानी समूहाची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित होती. अदानी समूहाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहभागींसाठी खुल्या असलेल्या निविदामध्ये सर्वोच्च बोली सादर केली होती. निविदेच्या अटी व शर्ती पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कॅबिनेट मंत्री होते. तसेच, विकास आराखडा २०३४ मध्ये परवडणाऱ्या घरांसाठी मिठागराची जागा अर्थात सॉल्ट पॅन जमिनी निश्चित केल्या होत्या, ज्याला २०१८ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने मान्यता दिली होती, ज्यामध्ये शिवसेना एक भाग होती. (Dharavi Redevlopment)

पारदर्शक आणि फायदेशीर पुनर्विकास प्रक्रिया

धारावीचे शहरी पुनर्विकासाच्या मॉडेलमध्ये रूपांतर करणे आणि मानवी-केंद्रित दृष्टिकोनाने राहणीमान सुधारणे हे ध्येय आहे. आम्ही या दृष्टीकोनासाठी समर्पित आहोत आणि पारदर्शक आणि फायदेशीर पुनर्विकास प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सर्व भागधारकांसोबत जवळून काम करू,असेही अदानी समुहाने स्पष्ट केले. (Dharavi Redevlopment)

निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून बिनबुडाचे आणि दुर्भावनापूर्ण आरोप

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासारखे राजकारणी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून बिनबुडाचे आणि दुर्भावनापूर्ण आरोप करत आहेत आणि खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी असल्याचेही स्पष्टीकरणात नमुद केले. (Dharavi Redevlopment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.