चौथ्या महिला धोरण २०२४ च्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करणार; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही

195
TMC : सहा हजारांहून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा; पालिका निवडणुकीआधीच शिंदेंची निर्णायक खेळी ?
  • प्रतिनिधी

चौथे महिला धोरण २०२४ जाहीर झाले असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी प्रभावीपणे काम करावे. या धोरणाच्या माध्यमातून राज्य शासन महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत आहे. त्यामुळे मुंबई शहरातील महिलांसाठी असलेल्या योजनांबाबत एकाच ठिकाणी माहिती मिळण्यासाठी एक नवीन ॲप तयार करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी दिले. चौथे महिला धोरण २०२४ जिल्हास्तरीय अंमलबजावणी सुकाणु समितीची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधानसचिव नविन सोना, जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी रवि रतन कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटील, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, मुंबई शहर शैलेश भगत, मुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Eknath Shinde)

(हेही वाचा – Bombay High Court : हायकोर्टाकरिता आरक्षित असलेल्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टीधारकांना हटविणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, मुंबई शहरातील लोकसंख्या लक्षात घेवून येथील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल, लहान मुलांसाठी पाळणाघर, झोपडपट्टी भागात तसेच इतर गरजू महिला असतील त्या ठिकाणी महिला बचत गट स्थापन करणे, बचतगटांना रोटेशन पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून देणे, महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी पर्यटनाचे प्रकल्प विकसित करणे, महिला मच्छिमारांसाठी शासकीय योजना राबविणे यावर भर देण्यात यावा. आदिवासी महिलांसाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात. घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, महिलांना आरोग्य सुविधा तत्काळ देणे तसेच काळानुरूप आरोग्य सुविधा वाढविणे याबाबत काम करावे. राज्य सरकार कडून सरकार आपल्या दारी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Eknath Shinde)

(हेही वाचा – आर्थिक शिस्तीसाठी अंदाज समिती महत्त्वाची; अमृत महोत्सवी राष्ट्रीय परिषदेत लोकसभाध्यक्ष Om Birla यांचे प्रतिपादन)

राज्यातील महिला हिंसाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असून शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सुरक्षा तसेच इतर महत्त्वपूर्ण योजना एकाच ॲपवर उपलब्ध होतील यासाठी मुंबई शहरसाठी ॲप विकसित करून ते ॲप सर्व महिलापर्यंत पोहोचवा. महिलांच्या मदतीसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना तत्काळ पोहोचवाव्यात. हेल्प डेस्कची व्याप्ती वाढवा, हिरकणी कक्ष नियमित सुरू ठेवा, महिला समुपदेशन केंद्रात तत्काळ समुपदेशन केले जावे, वन स्टॉप सेंटरमध्ये महिलांना सुविधा द्याव्यात. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तक्रार देताना महिलांना आधार वाटला पाहिजे. त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार दाखल करावी अशा प्रकारचे वातावरण पोलीस स्टेशनमध्ये असावे. शासन महिलांच्या बाबतीत आलेल्या तक्रारी फास्ट ट्रॅकवर घेत आहे.कारण राज्याला एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महिलांचाही मोठा वाटा असणे गरजेचे असल्याने प्रशासनानेही त्या दृष्टीने काम करावे असेही निर्देश दिल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यात चौथे महिला धोरण २०२४ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी चौथे महिला धोरण-२०२४ संदर्भात जिल्हास्तरीय सुकाणू समिती करत असलेल्या कामाचे सादरीकरण केले. एकंदरीतच महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, कौशल्य विकास विभाग, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्याकडून मुंबई शहरांमध्ये राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांचीही यावेळी माहिती देण्यात आली. (Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.