Crude Oil Prices : इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्चं तेल भडकलं

Crude Oil Prices : कच्च्या तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत 

104
Crude Oil Prices : इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्चं तेल भडकलं
Crude Oil Prices : इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्चं तेल भडकलं
  • ऋजुता लुकतुके

मध्य-पूर्व आशियातील (Central-East Asia) संघर्ष भडकल्यावर कच्च्या तेलाच्या किमती एका दिवसांत ४ टक्क्यांनी चढल्या आहेत. तर ब्रेंट क्रूडही प्रती बॅरल ९० डॉलरवर पोहोचलं आहे. इस्त्रायलने इराणवर (Iran-Israel) क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची बातमी गुरुवारी रात्री पसरली. तिथून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ माजला. विशेष म्हणजे इराणने हल्ला झाल्याचं म्हटलंय. तर इस्त्रायलने अजून कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे फक्त गोंधळाची परिस्थिती जगभर आहे. त्यातच रॉयटर्स या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेनं हल्ला क्षेपणास्त्रांचा नसून ड्रोन हल्ला असल्याचं म्हटलंय. (Crude Oil Prices)

(हेही वाचा- IPL 2024, Rohit Sharma on Impact Player : ‘क्रिकेटमध्ये ११ खेळाडू असतात, १२ नाही’)

पण, अशा अनिश्चितेच्या परिस्थितीत कच्चं तेल (crude oil) भडकणं अपेक्षितच होतं. कच्चं तेल ४ टक्के, ब्रेंट क्रूड ३.८४ टक्के तर अमेरिकन टेक्सास क्रूड ४.०६ टक्क्यांनी चढलं आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, इसाफहान शङरातील विमानतळा जवळ क्षेपणास्त्र हल्ल्याचा आवाज आणि जाळ दिसून आला आहे. इसाफहान इथं इराणचा मुख्य हवाई तळ आहे. एकूणच या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किमती चढ्याच आहेत. मध्य-पूर्वेतील अनिश्चितता आणि ओपेक देशांनी कमी केलेला पुरवठा ही कारणंही त्या मागे आहेत.  (Crude Oil Prices)

मध्य-पूर्वेतील अनिश्चितता पाहता, कच्च्या तेलाच्या किमती इथून पुढे चढ्या असण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी इराणने इस्त्रायलवर (Iran-Israel) क्षेपणास्त्र आणि ड्रोनने (Missiles and drones) हल्ला केला. तिथून या संघर्षाला सुरुवात झाली आहे. (Crude Oil Prices)

(हेही वाचा- Israel-Iran Attack: इस्रायलने दिले इराणला प्रत्युत्तर; लष्करी तळ, अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ले)

युद्धाचा कच्च्या तेलावर का परिणाम होतो? 

जगातील बहुतेक गोष्टी या कच्च्या तेलावर चालतात. या तेलापासून इंधन बनतं. ते कारखाने, गाड्या, उपकरणं यांत वापरलं जातं. अगदी शेतीसाठीच्या यंत्रांनाही इंधन लागतं. कच्चं तेल हे जमिनीखालून काढलं जातं. पण, ते साठवता येत नाही. त्यामुळे ते सतत प्रवाही रहावं लागतं. शिवाय जगभरात आखाती देश, अमेरिका, रशिया अशा ठिकाणी जमिनीत कच्च्या तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. तिथून तेलाची वाहतूक जगभरात व्हावी लागते. युद्धसदृश परिस्थिती असेल तर ही वाहतूक शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती वाढत जातात. (Crude Oil Prices)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.