Cold Weather Update : गारठा वाढणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट होणार

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेशच्या काही भागात मध्यम धुके पाहायला मिळणार आहे. तर, चंदीगड, दिल्ली आणि आसामच्या काही भागात विरळ धुक्याची चादर पाहायला मिळेल.

154
Cold Weather Update : गारठा वाढणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट होणार

खास थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक शिमला, कुलू, मनाली ते जम्मू कश्मीर पर्यंतचा प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या थंडीची मजा दिल्लीकर घरातच अनुभवत आहेत. प्रचंड कडाक्याची थंडी (Cold Weather Update) आणि धुक्याचे साम्राज्य असल्यामुळे हिल स्टेशनला असल्याचा अनुभव दिल्लीकरांना येतोय. अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत धुकेच धुके दिसत आहेत. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे नियमित कामकाज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे शाळांना थंडीच्या सुट्ट्या दिल्ली सरकारने जाहीर केल्या आहेत.

(हेही वाचा – Rahul Dravid’s Son Bowling Action : राहुल द्रविडचा मुलगा समित गोलंदाजीच्या पूर्ण ॲक्शनमध्ये)

सध्या देशातील हवामानात बदल होत असून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या (Cold Weather Update) अंदाजानुसार, पुढील ४ ते ५ दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील ४ दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता आहे.

तापमानाचा पारा कमी होणार –

गुरुवार ११ जानेवारीपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी झाले असून कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून राज्याचे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Cold Weather Update)

(हेही वाचा – Loksabha : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन, भूमिपूजन केलेल्या विकास प्रकल्पांमुळे ‘या’ ११ लोकसभेच्या जागांवर महायुतीला होणार लाभ)

धुक्याची चादर –

अमृतसर, चंदीगड, पटियाला, अंबाला, गंगानगर, पालम, सफदरजंग, लखनौ या ठिकाणी खूप दाट धुके पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेशच्या काही भागात मध्यम धुके पाहायला मिळणार आहे. तर, चंदीगड, दिल्ली आणि आसामच्या काही भागात विरळ धुक्याची चादर पाहायला मिळेल. (Cold Weather Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.