Chali chali Re Patang : मकरसंक्रांती निमित्त हिंदी मराठी चित्रपटातील ८० ते ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांचा बहारदार कार्यक्रम!

खास गिरगावकरांसाठी 'सूर-ताल विलेपार्ले(पूर्व)'ची प्रस्तुती, रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५:४५ ते ८:३० चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगांव येथे होणार कार्यक्रम

234
Chali chali Re Patang : मकरसंक्रांती निमित्त हिंदी मराठी चित्रपटातील ८० ते ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांचा बहारदार कार्यक्रम!

संगीत साधनेसोबतच आपल्या रूढी परंपरांचे जतन करून त्या नव्यापिढीकडे हस्तांतरित व्हाव्यात या दृष्टीने एक एक पाऊल पुढे जात सामाजिक भान जपणारी ‘सूर-ताल’ विलेपार्ले(पूर्व) ही संस्था विविध माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असते. नुकतीच या संस्थेने जेष्ठ नागरिकांसोबत ‘शेतातील गाणे आणि स्वादिष्ठ खाणे’ या धर्तीवर हुर्डा पार्टी आयोजित करून एकल जेष्ठांमध्ये स्नेह वाढवला. तसेच आता मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘सूर-तालने रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी ‘चली चली रे पतंग’ (Chali chali Re Patang) या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गायक रुदय, अमित, उमेश, अर्चना आणि अमृता हे या कार्यक्रमात (Chali chali Re Patang) आपला स्वर मिसळणार असून प्रामुख्याने मकरसंक्रातीचे महत्व विशद करणाऱ्या लोकप्रिय गीतांतून हिंदू संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. हिंदी – मराठी लोकप्रिय चित्रपट गीतांचा या कार्यक्रमात समावेश असणार आहे. आकाशवाणीच्या प्रसिध्द आरजे पद्मजा बापये या कार्यक्रमाचे रंजक आणि खुसखुशीत निवेदन करणार आहेत.

(हेही वाचा – Cold Weather Update : गारठा वाढणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट होणार)

प्रवेश नोंदणी आवश्यक –

रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५:४५ ते ८:३० या वेळेत चित्तपावन ब्राह्मण संघ, निकदवारी लेन, सिटी को ऑप बँकेची गल्ली, गिरगांव, मुंबई ४०० ००४ येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम (Chali chali Re Patang) सर्वांसाठी खुला असून प्रवेश नोंदणी आवश्यक आहे. त्यासोबतच काही रांगा महिलांसाठी राखीव असणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन महेश कालेकर आणि भूषण शितूत यांच्याकडे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क महेश – ९७६९३४८४१, भूषण ९८२११५४७९६

(हेही वाचा – Low Calorie Breakfast : सकाळी ‘हे’ पदार्थ खा; वजन वाढण्याची काळजीच नाही…)

‘सूर-ताल’ विषयी –

गायिका अमृता देवधर यांच्या संकल्पनेतून ‘सूर-ताल विले-पार्ले(पूर्व)’ या संस्थेची मुहूर्तमेढ ५ मार्च २०१९ रोजी रोवली गेली. संस्थेने स्थापनेपासून सुरु केलेल्या ‘सूर-ताल कराओके क्लब’ला सर्व स्थरातील, वयातील संगीत दर्दींनी उदंड प्रतिसाद दिला आहे. संस्थेने अनेक उत्तमोत्तम संगीतमय कार्यक्रमांची निर्मिती करून रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. खास जेष्ठ नागरिकांसाठी विविध सहली, आरोग्य शिबिरे, दिवाळी संध्या, तसेच मुंबईसह पुण्यातील हौशी गायक गायिकांसाठी ‘कराओके ट्रॅक गायन स्पर्धा’ आयोजित करून, त्यांच्या हातात माईक देऊन त्यांना गाते करून, गाणे गुणगुणणाऱ्यांच्या मनातली सुप्त ईच्छा पूर्ण केली. ‘सूर-ताल’ नवोदित हौशी गायक-गायिकांसाठी हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. करोना काळात अनेक विस्थापितांना मदतीचा हात पुढे केला, तसेच कोकणातील पुरामुळे उध्वस्थ झालेल्या कोकण वासियांसाठीही मदत करून सामाजिक भान जपले आहे. ‘भारतरत्न लता मंगेशकर’ आणि ‘संगीतकार बप्पी लाहिरी’ यांना संगीतमय मानवंदना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सांज ये गोकुळी’ असे अनेक गाण्यांचे सुरेल कार्यक्रम केले आहेत. पंडित अशोक पत्की यांच्यासह संगीत विशारद नानू गुर्जर, प्रसिद्ध गायक यशवंत कुलकर्णी, आनंद देवधर असे अनेक दिग्गज संस्थेचे मार्गदर्शक आहेत. (Chali chali Re Patang)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.