Rahul Dravid’s Son Bowling Action : राहुल द्रविडचा मुलगा समित गोलंदाजीच्या पूर्ण ॲक्शनमध्ये

१९ वर्षांखालील कूचबिहार करंडक स्पर्धेत समित द्रविडची सहजसुंदर बोलिंग ॲक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. 

240
Rahul Dravid’s Son Bowling Action : राहुल द्रविडचा मुलगा समित गोलंदाजीच्या पूर्ण ॲक्शनमध्ये
Rahul Dravid’s Son Bowling Action : राहुल द्रविडचा मुलगा समित गोलंदाजीच्या पूर्ण ॲक्शनमध्ये
  • ऋजुता लुकतुके

१९ वर्षांखालील कूचबिहार करंडक स्पर्धेत (Cooch Behar Trophy Tournament) कर्नाटक वि मुंबई असा अंतिम सामना सुरू आहे. आणि कर्नाटकने नाणेफेक जिंकून मुंबईला पहिला फलंदाजी दिल्यावर कर्नाटककडून युवा गोलंदाज समित द्रविडची (Samit Dravid) आक्रमक गोलंदाजी लोकांना पाहायला मिळाली. समित भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुलगा आहे. मुंबई विरुद्ध त्याने १९ षटकं टाकली. आणि यात मोलाचे दोन बळीही मिळवले. (Rahul Dravid’s Son Bowling Action)

मुंबईचा संघ (Mumbai Team) अखेर ३८० धावांवर बाद झाला. आणि समितने (Samit Dravid) १९ षटकांत ६० धावा देत २ बळी मिळवले. यात समितची (Samit Dravid) गोलंदाजीची शैली सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. (Rahul Dravid’s Son Bowling Action)

(हेही वाचा – Maratha Survey : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामासाठी वाढीव मानधन)

समित (Samit Dravid) नियमितपणे १९ वर्षांखालील कर्नाटकच्या संघासाठी खेळतो. आणि सीनिअर गटात प्रवेश करण्याच्या टप्प्यावर आता तो पोहोचला आहे. वडील राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी अलीकडेच समितच्या (Samit Dravid) क्रिकेट वाटचालीविषयी भाष्य केलं होतं. जिओ सिनेमावरील एका कार्यक्रमात बोलताना राहुल (Rahul Dravid) म्हणाला होता, ‘मी मुलाला क्रिकेटवर मार्गदर्शन करत नाही. पालक आणि क्रिकेट प्रशिक्षक अशा दोन भूमिका एकाच वेळी निभावणं मला शक्य होत नाही.’ (Rahul Dravid’s Son Bowling Action)

पण, द्रविड (Rahul Dravid) वेळोवेळी समित (Samit Dravid) आणि अव्यय या आपल्या दोन्ही मुलांचे सामने पाहण्यासाठी हजेरी लावतो. (Rahul Dravid’s Son Bowling Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.