​Cleanliness campaign : खाकी वर्दीतील सामाजिक बांधिलकीचे दर्शन

डीसीपी अतुल झेंडेंच्या सहभागातून कल्याण-डोंबिवलीत स्वच्छता अभियान संपन्न.

148
​Cleanliness campaign : खाकी वर्दीतील सामाजिक बांधिलकीचे दर्शन
​Cleanliness campaign : खाकी वर्दीतील सामाजिक बांधिलकीचे दर्शन
  • कल्याण : प्रतिनिधी

समाजात पसरलेली जळमटे तर पोलिस (Police) नेहमीच साफ करत असतात. मात्र परिसर स्वच्छ, साफ आणि सुंदर दिसण्यासाठी देखिल खाकी वर्दी मागे नसल्याचे कल्याण-डोंबिवलीकरांना दिसून आले. स्वच्छता हीच सेवा, हा मंत्र जपत सामाजिक जबाबदारीचे भान राखून ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) परिसरात रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) यांचा प्रत्यक्ष सहभाग हे या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले. कायदा, शांतता आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खाकी वर्दीने प्रत्यक्ष हातात झाडू घेतल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये स्वच्छतेचा सकारात्मक संदेश गेला आहे. (​Cleanliness campaign)

Maharashtra Assembly 2024 दिव्यांग मतदारांची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था 2026 03 01T143514.401

(हेही वाचा – US Israel airstrikes Iran: खामेनेईंच्या मृत्यूने पाकिस्तान पेटला; कराचीत अमेरिकन दूतावासाला लावली आग, १५ जणांचा मृत्यू)

एकीकडे समाजातील गुन्हेगारी नियंत्रित करणे, तर दुसरीकडे कुठेही हिंसाचाराचे गालबोट लागून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिस प्रशासनाने या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदविला. भावी पिढीला उध्वस्त करू पाहणाऱ्या भल्या भल्यांना जेलवारी घडविणाऱ्या उपायुक्त अतुल झेंडे यांनी केवळ उपस्थिती न लावता, स्वतः स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले. त्यांच्यासोबत अन्य अधिकारी आणि कर्मचारीही या मोहिमेत सामील झाले होते. या मोहिमेत कल्याणच्या दुर्गाडी, खडकपाडा सर्कल, बिर्ला कॉलेज (Birla College) परिसरासह शहरातील मुख्य रस्ते झाडून साफ करण्यात आले. ​(​Cleanliness campaign)

1004303866

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने देशपातळीवर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून हे अभियान राबवण्यात आले. पोलिसांपैकी ४० अधिकारी, २१० कर्मचारी, तसेच प्रतिष्ठानच्या १७५ श्री सदस्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कल्याण-डोंबिवलीतील विविध परिसर चकाचक केले. अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश दिल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. ​या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. पोलिस खात्याने जोपासलेली ही सामाजिक बांधिलकी इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याच्या भावना या मोहिमेत सहभागी झालेल्यांनी व्यक्त केल्या. ​(​Cleanliness campaign)

सकारात्मकता सुरक्षिततेसाठी पूरक – डीसीपी अतुल झेंडे

स्वच्छ शहर, सुरक्षित शहर ही संकल्पना मांडताना उपायुक्त अतुल झेंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एखादे शहर जेव्हा स्वच्छ असते, तेव्हा तिथे राहणाऱ्या नागरिकांची वृत्तीही सकारात्मक राहते. हीच सकारात्मकता शहराच्या सुरक्षिततेसाठी पूरक ठरते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (​Cleanliness campaign)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.