SSC Exam : शुक्रवारपासून दहावीची परीक्षा सुरु; यंदा ३२ हजार विद्यार्थी वाढले

134

शुक्रवार, १ मार्चपासून राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षी या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे यावर्षी २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘टाईम्स स्क्वेअर’वर झळकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा टीझर)

४०० भरारी पथके स्थापन 

दहावी परीक्षेसाठी (SSC Exam) राज्य शिक्षण मंडळातर्फे २७१ भरारी पथके स्थापन केली आहेत. यासह महसूल, ग्रामविकास, पाेलिस दल आणि जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत. राज्यभरात अशी एकूण ४०० भरारी पथके परीक्षा (SSC Exam) कालावधीत हाेणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत. २६ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता अर्धा तास अगाेदर परीक्षा केंद्रावर पाेहाेचावे. सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येईल, परीक्षेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.