Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडे गुरुजींच्या गाडीवर हल्ला

पू. भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) मालेगावला जात असतानाच नाशिकच्या मनमाड येथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला.

647
नाशिक, मनमाड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडे गुरुजींच्या (Sambhaji Bhide) यांची गाडी अडवत हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पू. संभाजी भिडे गुरुजी हे येवला येथून मालेगावच्या दिशेने जात असतांना आंबेडकर अनुयायी यांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी आक्रमक झालेल्या काहींनी थेट गुरुजींच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न झाला.

काय आहे प्रकरण? 

पू. भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) मालेगावला जात असतानाच नाशिकच्या मनमाड येथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. पू. संभाजी भिडे मुर्दाबादच्या अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच अश्लील शब्दातही घोषणाबाजी केली गेली. सुरुवातीला काळे झेंडे दाखवण्यात आले आणि नंतर थेट पू. भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी काही तरुण आणि तरुणी थेट पू. भिडे (Sambhaji Bhide) यांच्या गाडीच्या समोर आले. त्यांची गाडी अडवून गाडीवर जोरजोराने हाताने मारत शिवीगाळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि गाडी अडवणाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर पू. संभाजी भिडे धुळ्याकडे रवाना झाले. काळे झेंडे दाखवणाऱ्या आणि पू. भिडे यांच्यावर गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.