Veer Savarkar : ‘टाईम्स स्क्वेअर’वर झळकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा टीझर

344
स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंड! भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अवघे आयुष्य अर्पण करणारे वीर सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा उद्घोष केला. तरुणांचे संघटन केले आणि ब्रिटिशांना स्वातंत्र्य देण्यासाठी परावृत्त केले. त्याच तात्यारावांनी जातीनिर्मुलनाचे कार्य करून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडून हिंदू संघटनही केले. असे बहुअंगी स्वरूपाचे कार्य करणाऱ्या वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटामध्ये विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्कमधील टाइम्स स्वेअरवर झळकला.

टाइम्स स्वेअर येथे भारतीयांनी केला जल्लोष 

याआधी अभिनेता रणदीप यांनी वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) पुण्यतिथी निमित्ताने शेयर केलेल्या इंस्टा पोस्टची चर्चा होत होती. त्यात त्यांनी अंदमान सेल्युलर जेलमधील काही फोटो पोस्ट केले होते. ज्या तुरुंगात सावरकर इतक्या वर्ष होते त्या जेलमध्ये मी काही मिनिटे देखील राहू शकत नाही. अशा शब्दांत रणदीप यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीप हुडा यांनी वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) बायोपिकसाठी घेतलेली मेहनत, त्यासाठी त्यांनी केलेले आणि चिंतन याविषयी अनेक पोस्ट आणि बातम्या समोर आल्या होत्या. या सगळ्यात आता टाईम्स स्क्वेअरमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यात रणदीप हुडा यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ दिसून येत आहे. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या भारतीयांनी जल्लोष करत रणदीप यांच्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या आहेत.

२२ मार्चला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या २२ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. रणदीप हुडा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यामध्ये अंकिता लोखंडे, अमिंदरदीप सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रणदीप हुडा यांनी जेव्हा त्यांच्या नव्या चित्रपटाचा टीझर व्हायरल केला होता तेव्हा तो पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले होते. त्यातील त्यांची भूमिका, त्यांची देहबोली, वेशभूषा या साऱ्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.