Kitchen Garden Bmc School : महापालिका शाळांमधून घडणार भावी शेतकरी

मुंबई महापालिकेच्या १०० शालेय इमारतींमध्ये किचन गार्डन प्रकल्प

787
Kitchen Garden Bmc school : महापालिका शाळांमधून घडणार भावी शेतकरी
Kitchen Garden Bmc school : महापालिका शाळांमधून घडणार भावी शेतकरी

शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने महापालिका शाळांमध्ये (Bmc school) प्रायोगिक तत्वावर किचन गार्डनची संकल्पना राबवण्यात येत असून आता अशाप्रकारे एकूण १०० शाळांमध्ये किचन गार्डन तयार केली जाणार आहेत. या किचन गार्डनसाठी (Kitchen Garden Bmc school) लागणारे सर्वप्रकारचे साहित्य पुरवण्यासाठी महापालिकेच्यावतीने (Municipal  Corporation) सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Kitchen Garden Bmc school)

महापालिका शिक्षण (Bmc school) विभागांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना ऑरगॉनिक फार्मिंग अर्थात किचन गार्डनचे कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी विषयांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके देण्याबाबत महापालिका शिक्षण (Bmc school) विभागातील १०० शालेय इमारतीमध्ये (building) किचन गार्डन (Kitchen Garden Bmc school) प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे. यासाठीची  निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १०० शालेय इमारतींमध्ये  १०० किचन गार्डन प्रकल्प स्थापन करण्याच्या कामांसाठी मागवलेल्य निविदेमध्ये प्रोबीट प्लस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी दोन कोटी ५१ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. (Kitchen Garden Bmc school)

(हेही वाचा- Dongri laxmi Building : डोंगरीतील त्या अनधिकृत इमारतीवर महापालिकेने पाच वेळा केली होती कारवाई)

या नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या (contractor) माध्यमातून प्रत्येक शाळांमध्ये सॉईल लेस ऑरगॅनिस मेटीयम हे प्रति शाळा हे ८०० किलो तसेच ऑरगॅनिक प्लांट प्राटेक्शन किट, ग्रीन नेट पॅकींग, सिड पॅकेट्स, शेण, हँड स्प्रे, ड्रीप मोटर, कॉमन युपीव्हीसी पाईप वॉटर सप्लाय, रेन वॉटर पाईप, स्प्रिंकलर पाईप, पॅकींग बॅग, बॉटल्स आणि कॅन आदी प्रकारचे साहित्य व प्रशिक्षण पुरवले जाणार आहे. (Kitchen Garden Bmc school)

एरवी शेतीपासून (Farmer) अलिप्त राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजावून सांगणे. त्यामध्ये पर्यावरण आणि शेती (Farmer) यासारख्या क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवून या क्षेत्रात कारकीर्दीसाठी त्यांचे मन वळवणे, हादेखील उपक्रमाचा उद्देश आहे. म्हणूनच प्राथमिक अवस्थेतच पर्यावरणात घडणाऱ्या बदलांसाठी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे, हा उपक्रमाचा उद्देश आहे.  महापालिका शिक्षण (Bmc school) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार किचन गार्डनिंग (Kitchen Garden Bmc school) हे एक तंत्रज्ञान असून शहरातील विद्यार्थ्यांना सेंद्रीय पध्दतीने पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांचे महत्व समजेल आणि विद्यार्थी जंक फुडच्या दुष्पपरिणामापासून दूर होऊन त्यांना सदृढ, निरोगी आरोग्य प्राप्त होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे केवळ पैसा आणि वेळ वाचते असे नाही तर  निरोगी, उपयुक्त आणि पर्यावरणपुरक भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो,असे शिक्षण  विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Kitchen Garden Bmc school)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.