‘डॉन अभी जिंदा है’

२२ एप्रिल रोजी तुरुंगातच त्याला कोविडची लागण झाली होती. २४ एप्रिल रोजी त्याची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कडक सुरक्षेत दाखल करण्यात आले आहे.

73

हिंदू डॉन म्हणून अंडरवर्ल्डमध्ये ओळख असणारा छोटा राजन उर्फ नाना याचा कोविडने मृत्यू झाल्याच्या अफवेने देशात खळबळ उडवून दिली होती. मात्र ‘डॉन अभी जिंदा है’ हे सांगण्यासाठी अखेर तिहार तुरुंग प्रशासनाला पुढे यावे लागले. छोटा राजन याच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्नालयाच्या ट्रॉमा विभागात उपचार सुरु आहे.

…आणि छोटा राजनचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले!

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमला चॅलेंज देणारा कुख्यात डॉन छोटा राजन हा गुन्हेगारी जगतात हिंदू डॉन म्हणून ओळखला जातो. छोटा राजन हा सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, २२ एप्रिल रोजी तुरुंगातच त्याला कोविडची लागण झाली होती. २४ एप्रिल रोजी त्याची प्रकृती ढासळल्यामुळे त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कडक सुरक्षेत दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर एम्सच्या ट्रॉमा विभागात उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी छोटा राजनचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे देशभरात पसरले.

(हेही वाचा : शरद पवारांना बारमालकांचा कळवळा, शेतकऱ्यांचाही ठेवा! भाजपचा टोला )

अफवा कुठून आणि कशी पसरली?

या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यासाठी कुठलीही यंत्रणा पुढे आली नाही. त्यामुळे छोटा राजनचा मृत्यू झाला का नाही, असे संभ्रमाचे वातावरण पसरले होते. अनेक वृत्तवाहिन्यांच्या वेबसाइटवर छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त झळकू लगाल्यामुळे अनेकांना छोटा राजन गेल्याची खात्री झाली. सोशल मीडियावर देखील काही तासात छोटा राजनच्या निधनाची बातमी व्हायरल होऊ लागली. अखेर एम्स रुग्नालयाकडून छोटा राजनच्या प्रकृतीची माहिती घेऊन तिहार तुरुंग प्रशासनाने छोटा राजन जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची अधिकृत माहिती दिली. या माहितीनंतर छोटा राजनच्या मृत्यूची अफवा होती हे समोर आले. मात्र छोटा राजनचा मृत्यू झाला ही अफवा कुठून आणि कशी पसरली याबाबत मात्र काहीही कळू शकले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.