Unseasonal Rain : पुढील ४८ तासांत राज्यासह देशात अवकाळी पावसाची शक्यता

167
देशासह राज्यात काही ठिकाणी शनिवार, २ मार्चपासून ४८ तासांत काही भागात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, मराठवाडासह विदर्भात पुन्हा पावसाचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा (Unseasonal Rain) फटका बसला आहे. पुढील 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. नाशिक, बुलढाणा, जालना, हिंगोली भागात गेल्या दोन दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
मुंबईत सध्या दमट आणि गरम हवामान पाहायला मिळत आहे. तर दुपारी  अंशतः ढगाळ वातावरण राहील. आज मुंबईत तापमान सुमारे 26-27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आजही मुंबईसह ठाण्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात ही साधारणत: अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.