Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर

मोटरमन शर्मा यांच्या अपघातीमृत्यूनंतर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (सीआरएमएस) मुंबई विभागाने मध्य रेल्वेला दोषी ठरवले. मोटरमन अतिरिक्त काम करतात. मात्र एखाद्या वेळी चुकून सिग्नल ओलांडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होते.

253
Central Railway ने स्विकारली टॉवर वॅगनमध्ये इंधन भरण्याची आधुनिक प्रणाली

मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी सँडहर्स्ट रोड ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रगती एक्सप्रेस ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी मुरलीधर शर्मा पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये (Central Railway) कर्तव्यावर होते. यादरम्यान सीएसएमटीकडे लोकल घेऊन जात असताना त्यांच्याकडून कुर्ला स्थानकात सिग्नल पासिंगची घटना घडली.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माकडून घ्या नेतृत्वाच्या टीप्स)

मोटरमनचा संताप –

मोटरमन शर्मा यांच्या अपघातीमृत्यूनंतर सेंट्रल रेल्वे (Central Railway) मजदूर संघाच्या (सीआरएमएस) मुंबई विभागाने मध्य रेल्वेला दोषी ठरवले. मोटरमन अतिरिक्त काम करतात. मात्र एखाद्या वेळी चुकून सिग्नल ओलांडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होते. मुळात अशा घटनांना अन्य बाबीही जबाबदार असतात. मोटरमनच्या जागा रिक्त असल्याने मोटरमन यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Elon Musk to Discontinue Phone No : एलॉन मस्क फोन वापरायचं का सोडणार आहेत?)

रेल्वे वाहतूक पूर्वपदावर –

याच पार्श्वभूमीवर शनिवार १० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेची (Central Railway)सेवा विस्कळीत झाली होती. मात्र आता ती सेवा पूर्वपदावर आली आहे. मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला होता.

(हेही वाचा – Firing : मुंबईनंतर आता पुणे हादरले; घोसाळकरांच्या हत्येनंतर पुण्यात दुकानदारावर गोळ्या झाडून स्वतःला संपवले)

१०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द –

शनिवारी दुपारी शर्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, मात्र त्यांचे नातेवाईक येणार असल्याने अंत्यसंस्काराची वेळ ५ ठेवण्यात आली होती. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराचे कारण देत मुख्य आणि हार्बरमार्गावरील शेकडो मोटरमनने अतिरिक्त काम करण्यास नकार दिला. शिवाय इतर मोटरमन शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला गेल्याने उपलब्ध नव्हते. यामुळे मुख्य-हार्बर मार्गावरील १०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. (Central Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.