Elon Musk to Discontinue Phone No : एलॉन मस्क फोन वापरायचं का सोडणार आहेत?

काही महिन्यात आपण फोन वापरणं सोडणार असून संदेश आणि ऑडिओ, व्हिडिओ संदेशांसाठीही सोशल मीडिया वापरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

164
Elon Musk to Discontinue Phone No : एलॉन मस्क फोन वापरायचं का सोडणार आहेत?
Elon Musk to Discontinue Phone No : एलॉन मस्क फोन वापरायचं का सोडणार आहेत?
  • ऋजुता लुकतुके

अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) येत्या काही दिवसांत फोन नंबर वापरणं सोडून देणार आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ मेसेजसाठी आपण सोशल मीडिया वापरणार असल्याचं त्यांनी अलीकडेच ट्विटरवर जाहीर केलं आहे. स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटर या सोशल मीडियाचीही मालकी आहे. आणि येत्या काही दिवसांत ट्विटरवर ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश देण्याची सुविधा सुरू होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरच मस्क यांनी फोन नंबर न वापरण्याची घोषणा केली आहे. (Elon Musk to Discontinue Phone No)

सुरुवातीला अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनाच ही सुविधा मिळेल. ‘येत्या काही महिन्यात मी ऑडिओ आणि व्हिडिओ संदेशांसाठी ट्विटरच वापरणार आहे. माझा फोन नंबर मी बंद करणार,’ असं मस्क (Elon Musk) यांनी ट्विट केलं आहे. (Elon Musk to Discontinue Phone No)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्याकडून सरवणकर, शिरसाट यांची विचारपूस)

हा आहे एलॉन मस्क यांचा मानस 

ट्विटरला आगामी काळात ‘ग्लोबल ॲड्रेस हब’ बनवण्याचा मस्क यांचा मानस आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची डिजिटल ओळख हे ट्विटरचं खातं असलं पाहिजे, असा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने त्यांनी ट्विटरवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सेवा अलीकडेच सुरू केली आहे. सुरुवातीला अँड्रॉईड फोनवर ही सुविधा असली तरी इतर मोबाईल फोनधारक अँड्रॉईडधधारकांनी केलेला कॉल उचलू शकतील. अर्थात ट्विटरची ही शुल्क देऊन लाभ घेता येईल अशी सेवा आहे. (Elon Musk to Discontinue Phone No)

ट्विटरमध्ये तुमचं खातं असेल तर या सेवेचा लाभ तुम्हाला अतिरिक्त कुठलीही नोंदणी न करता मिळू शकेल. अर्थात, ट्विटर खात्याचे प्रिमिअम सदस्य तुम्ही असाल तर! (Elon Musk to Discontinue Phone No)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.