Firing : मुंबईनंतर आता पुणे हादरले; घोसाळकरांच्या हत्येनंतर पुण्यात दुकानदारावर गोळ्या झाडून स्वतःला संपवले

508
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना (Firing) घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोन्हा याने फेसबुक लाईव्ह करत गोळीबार करुन हत्या केली आणि मग स्वतःला गोळीबार करुन आत्महत्या केली. हे प्रकरण ताजे असताना अशीच काहीशी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सराफा व्यावसायिकाने दुकान मालकावर गोळीबार (Firing) करुन आत्महत्या केली आहे. अनिल सखाराम ढमाले असे गोळीबार करुन आत्महत्या करणाऱ्या गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश गजानन जाधव असे या गोळीबारात जखमी झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे.

पैशाच्या वादातून हत्या 

पुण्यातील औंध परिसरात पैशांच्या वादातून गोळीबार (Firing) झाल्याची घटना झाली. अनिल सखाराम ढमाले याने आकाश गजानन जाधव यांच्यावर गोळीबार करुन स्वतःवर देखील गोळी मारुन घेतली आहे. ज्युपीटर रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली आहे. गोळीबार करणारा अनिल ढमाले यानं पैशाच्या वादातून हा गोळीबार (Firing) केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गोळीबार केल्यानंतर अनिल सखाराम ढमाले हा रिक्षातून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याकडे निघाला होता. त्याने आकाश गजानन जाधव यांच्यावर पैशांच्या वादातून गोळीबार केला. मात्र वाटेत त्याने स्वतः वर गोळीबार करून आत्महत्या केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.