CM Eknath Shinde यांच्याकडून सरवणकर, शिरसाट यांची विचारपूस

मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोघांच्या प्रकृतीची चौकशी करून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

378
CM Eknath Shinde यांच्याकडून सरवणकर, शिरसाट यांची विचारपूस

प्रकृती अस्वास्थ्यामुळे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी (१० फेब्रुवारी) रुग्णालयात जाऊन भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. (CM Eknath Shinde)

सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे प्लेटलेट्स काऊंट कमी होऊन त्यांना श्वासोच्छ्वास करायला त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती लागले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Handicap Financial Assistance : महापालिकेची प्रस्तावाला मंजुरी)

तर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मानेला गाठ झाल्याने त्यांना त्यावर उपचार करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल व्हावे लागले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या दोघांच्या प्रकृतीची चौकशी करून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.