President Droupadi Murmu : यांनी केले आदिवासी समुदायाच्या जीवनचक्राचे कौतुक

आपला देश विविधतेने परिपूर्ण आहे. मात्र ‘विविधतेत एकता’ ही भावना कायम राहिली आहे. या भावनेचे कारण म्हणजे एकमेकांच्या परंपरा, खाद्यपदार्थ आणि भाषा जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा आपला उत्साह - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

187
President Droupadi Murmu : यांनी केले आदिवासी समुदायाच्या जीवनचक्राचे कौतुक

जगभरातील आदिवासी समुदाय शतकानुशतके निसर्गाच्या सान्निध्यात राहत आहेत. आपले आदिवासी बंधू-भगिनी आजूबाजूचे वातावरण, झाडे, वनस्पती, प्राणी यांची त्यांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक बाबतीत काळजी घेत आहेत. त्यांच्या जीवनशैलीतून आपण प्रेरणा घेऊ शकतो. आज जेव्हा संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तेव्हा आदिवासी समाजाची जीवनशैली अधिक अनुकरणीय बनते, असे (President Droupadi Murmu) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये आदि महोत्सव २०२४ चे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

(हेही वाचा – Central Railway: मोटरमनने आत्महत्या केल्यामुळे लोकल यंत्रणा कोलमडली, ८४ रेल्वेगाड्या रद्द)

आदि महोत्सव २०२४ –

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ट्रायफेडद्वारे भारतातील आदिवासी वारशाची समृद्ध विविधता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने आदि महोत्सवाचे आयोजन (President Droupadi Murmu) केले जात आहे. यावर्षी हा महोत्सव १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की,

आपला देश विविधतेने परिपूर्ण आहे. मात्र ‘विविधतेत एकता’ ही भावना कायम राहिली आहे. या भावनेचे कारण म्हणजे एकमेकांच्या परंपरा, खाद्यपदार्थ आणि भाषा जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा आपला उत्साह. ही एकमेकांबद्दलची आदराची भावना आपल्या ऐक्याचा गाभा आहे. आदि महोत्सवात आदिवासी संस्कृती आणि विविध राज्यांच्या वारशाचा अनोखा संगम पाहून आनंद झाल्याचे सांगून देशाच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बंधू-भगिनींची जीवनशैली, संगीत, कला, पाककृती यांची ओळख करून घेण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. या महोत्सवात आदिवासी समाजाच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी लोकांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (President Droupadi Murmu)

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : धमक्या आल्या म्हणून चळवळीपासून अलिप्त होणार नाही)

सर्वांगीण विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर –

राष्ट्रपती (President Droupadi Murmu) पुढे म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचे आधुनिक युगात एक महत्त्वपूर्ण योगदान आहे. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. समाजातील सर्व लोकांचा, विशेषत: वंचित घटकांचा शाश्वत विकास आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न असायला हवा.

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्याकडून सरवणकर, शिरसाट यांची विचारपूस)

राष्ट्रपती (President Droupadi Murmu) म्हणाल्या की, भारताकडे पारंपारिक ज्ञानाचे अमूल्य भांडार आहे. हे ज्ञान अनेक दशकांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पारंपारिकतेने दिले जात आहे. पण आता अनेक पारंपरिक कौशल्ये नष्ट होत आहेत. ही ज्ञान परंपरा नामशेष होण्याचा धोका आहे. ज्याप्रमाणे अनेक वनस्पती आणि प्राणी नामशेष होत आहेत, त्याचप्रमाणे आपल्या सामूहिक स्मृतीतून पारंपारिक ज्ञानही नाहीसे होत आहे. हा अमूल्य निधी जमा करून आजच्या गरजेनुसार त्याचा योग्य वापर करण्याचाही आपला प्रयत्न असायला हवा. या प्रयत्नात तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे त्यांनी सांगितले. तसेच ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल समस्येतही आदिवासींची जीवनशैली अनुकरणीय असल्याचे राष्ट्रपतींनी (President Droupadi Murmu) सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.