Chhagan Bhujbal : धमक्या आल्या म्हणून चळवळीपासून अलिप्त होणार नाही

या धमक्या आणि मला चळवळीपासून अलिप्त करण्यासाठी जे काही षडयंत्र चालू आहे त्याबाबतची काही माहिती मला आहे. उदाहरणार्थ हे सर्व षडयंत्र करणारे कोणत्या हॉटेल समोर भेटतात, त्यांच्या गाड्यांचे नंबर, काहींचे टेलीफोन नंबर हे सर्व मला माहिती आहे

181
Chhagan Bhujbal: कोण कशाला घात करेल, सगळी नाटकं मराठा समाजाला समजली, छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal: कोण कशाला घात करेल, सगळी नाटकं मराठा समाजाला समजली, छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

मला कितीही धमक्या आल्या तरीही मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे आणि सुरू असलेले कार्य हे करत राहील अशी स्पष्ट भूमिका राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे.

(हेही वाचा – Police Transfers: राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या)

निवासस्थानी धमकीचे पत्र –

भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांच्या निवासस्थानी धमकीचे पत्र मिळाले. या धमकीच्या पत्रावरती शनिवारी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आतापर्यंत मला अशा अनेक स्वरूपाच्या धमक्या आल्या आहेत. मी माझा उद्देश, माझे ध्येय आणि त्या चळवळीसाठी काम करत आहे. त्यामुळे यापुढेही ही चळवळ अशीच कायम राहील. अशा किती धमक्या आल्या तरी मी (Chhagan Bhujbal) त्याला घाबरणार नाही, असे स्पष्ट करून भुजबळ पुढे म्हणाले की या सर्व परिस्थितीबाबत मला जे काही सांगायचे आहे ते मी पोलिसांना सांगितले आहे. सर्व माहिती मी पोलिसांना दिली आहे.

(हेही वाचा – पोषण अभियानंतर्गत काम करणाऱ्या Anganwadi Sevika ना १.१५ लाख मोबाईल)

हे सर्व मला माहिती आहे –

या धमक्या आणि मला (Chhagan Bhujbal) चळवळीपासून अलिप्त करण्यासाठी जे काही षडयंत्र चालू आहे त्याबाबतची काही माहिती मला आहे. उदाहरणार्थ हे सर्व षडयंत्र करणारे कोणत्या हॉटेल समोर भेटतात, त्यांच्या गाड्यांचे नंबर, काहींचे टेलीफोन नंबर हे सर्व मला माहिती आहे आणि हे मी पोलिसांना सांगितले आहे. याबाबत सर्व कारवाई पोलीस करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Chhagan Bhujbal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.