पोषण अभियानंतर्गत काम करणाऱ्या Anganwadi Sevika ना १.१५ लाख मोबाईल

अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका हा ग्रामीण भागातील कुपोषित बालके आणि स्तनदा माता यांच्यासाठी काम करणारी एक प्रभावी यंत्रणा असून एकूणच आरोग्य व्यवस्था या पायावरच सुदृढ आहे. केंद्र शासनाची ही योजना असून या पोषण अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरीता केंद्र शासनाने प्रशासकीय मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

326
पोषण अभियानंतर्गत काम करणाऱ्या Anganwadi Sevika ना १.१५ लाख मोबाईल

पोषण अभियानंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यभरात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika), पर्यवेक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना जवळपास १ लाख १५ हजार स्मार्ट फोन देण्यात येणार असून त्यासाठी सुमारे १५५ कोटी रुपये खर्च येणार आहे. (Anganwadi Sevika)

आरोग्य व्यवस्थेचा पाया

अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) आणि आरोग्य सेविका हा ग्रामीण भागातील कुपोषित बालके आणि स्तनदा माता यांच्यासाठी काम करणारी एक प्रभावी यंत्रणा असून एकूणच आरोग्य व्यवस्था या पायावरच सुदृढ आहे. केंद्र शासनाची ही योजना असून या पोषण अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता केंद्र शासनाने प्रशासकीय मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यामध्ये Information Computer Technology enabled Real Time Monitoring of scheme (ICT-RTM) या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Sevika) मोबाईल फोन व सिम कार्ड उपलब्ध करुन देणे, लाभार्थ्यांकरिता वाढ/विकास निरीक्षण साधने (Growth Monitoring Device) अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करुन देणे, प्रशिक्षण व क्षमता बांधणी करणे, अंगणवाडी केंद्रात Community Based Events (समुदाय विकास कार्यक्रम), (IEC-Information, Education and Communication) व जन आंदोलन उपक्रम राबविणे, तांत्रिक, अतांत्रिक मनुष्यबळ नियुक्त करणे इत्यादीचा समावेश होता. (Anganwadi Sevika)

(हेही वाचा – PM Narendra Modi : आव्हानांमुळे मला आनंद मिळतो)

GeM प्रणालीवर निविदा

त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika), पर्यवेक्षिका/मुख्यसेविका, तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरिता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार GeM प्रणालीवर निविदा प्रकाशित केली. (Anganwadi Sevika)

महिला बाल कल्याण विभागास मान्यता

त्यानुसार मे. एन. एफ. इन्फ्राटेक सर्व्हिस प्रा. लि. न्यू दिल्ली यांचा प्रति स्मार्ट मोबाईल फोन व निविदेत नमूद केल्याप्रमाणे इतर साहित्य याकरिता १३४५७.५३ रुपये दराने एकूण १,१४,९७४ एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या १५४ कोटी ७२ लाख खर्च करण्यास राज्य शासनाने महिला बाल कल्याण विभागास मान्यता दिली आहे. तसेच याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हे मोबाइल SAMSUNG Galaxy A05S या मॉडेलचे आहेत. (Anganwadi Sevika)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.