CBSE Board : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Exam Time Table : CBSE Board परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होतील आणि 10 एप्रिल 2024 पर्यंत घेतल्या जातील. बोर्डाच्या परीक्षा सुमारे 55 दिवस चालतील.

218
CBSE Board : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
CBSE Board : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक (Exam Time Table) जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होतील आणि 10 एप्रिल 2024 पर्यंत घेतल्या जातील. बोर्डाच्या परीक्षा सुमारे 55 दिवस चालतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2024 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

(हेही वाचा – Uday Samant : भिवंडी महापालिकेतील अधिकाऱ्याच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार; उदय सामंत यांचे आश्वासन)

10 वीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक वाचा PDF

20231211_class-x-date-sheet-for-board-examinations-2024

12 वीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक वाचा PDF

20231211_class-xii-date-sheet-for-board-examinations-2024

सकाळी 10:30 वाजता चालू होणार परीक्षा

CBSE बोर्डाच्या सर्व  परीक्षा सकाळी 10:30 वाजता चालू होणार आहेत.  विद्यार्थ्यांना परीक्षेची चांगली तयारी करता यावी, यासाठी परीक्षेच्या अनेक दिवस आधी वेळापत्रक (Exam Time Table) जाहीर करण्यात आले आहे. cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ही घोषणा करण्यात आली आहे.

प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारीपासून

या अनुशंगाने CBSEशी संलग्न शाळांमध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा (Practical Examination) 1 जानेवारीपासून सुरु होतील आणि 15 फेब्रुवारी 2024 रोजी संपतील. हिवाळी शाळांसाठी इयत्ता 10 वी आणि 12 वी या दोन्ही वर्गांसाठी 2023-24 सत्रासाठी व्यावहारिक मूल्यांकन परीक्षा (Practical Assessment Exam) 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.