CIDCO : घरांच्या विक्रीसाठी सिडकोची कोट्यवधीची निविदा; ठेकेदार कंपनीला १२८ कोटी रुपये अदा

मे. हेलिओस मीडियम बाजार प्रा. लि. आणि थॉटट्रेन्स डिझाईन्स प्रा. लि. संयुक्तरित्या सर्वात कमी दराची निविदा सादर केल्यामुळे त्यांना या कामासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

288
CIDCO : घरांच्या विक्रीसाठी सिडकोची कोट्यवधीची निविदा; ठेकेदार कंपनीला १२८ कोटी रुपये अदा
CIDCO : घरांच्या विक्रीसाठी सिडकोची कोट्यवधीची निविदा; ठेकेदार कंपनीला १२८ कोटी रुपये अदा

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या सिडकोने (CIDCO) नवी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) बांधण्यात येत असलेल्या घरांची विक्री, मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी खासगी कंपनी नेमली असून या कंपनीला आतापर्यंत वस्तू आणि सेवा करासह (GST) १२८ कोटी रुपये अदा केल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी विधानसभेत समोर आली. (CIDCO)

नवी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) बांधण्यात येत असलेल्या ६७ हजार घरांची विक्री, मार्केटिंग आणि जाहिरातबाजीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत भाजपच्या अमित साटम यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वरील माहिती दिली आहे. (CIDCO)

१५० कोटी रकमेचे प्रयोजन

सिडकोने (CIDCO) रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) मागवून विहीत कार्यपध्दतीद्वारे मे. हेलिओस मीडियम बाजार प्रा. लि. आणि थॉटट्रेन्स डिझाईन्स प्रा. लि. जेव्ही यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून या कामासाठी त्यांना ६९९ कोटीचे कंत्राट (जीएसटी शिवाय) देण्यात आले आहे. सिडकोमार्फत (CIDCO) प्रस्तावित असलेल्या घरांपैकी विविध टप्प्यात गृह विक्रीसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनांच्या जाहिरातीसाठी नियुक्त सल्लागाराच्या मार्गदर्शनाप्रमाणे जाहिरात करणाऱ्या एजन्सीला सिडकोकडून (CIDCO) देण्यात येणाऱ्या मोबदल्यासाठी १५० कोटी रकमेचे प्रयोजन करण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणताही खर्च करण्यात आलेला नाही, असे उत्तरात नमूद केले आहे. (CIDCO)

कंत्राटदार कंपनीला पहिल्या टप्प्यात निश्चित ४० टक्के रक्कम द्यावयाची होती. कंपनीने ६७ हजार घरांऐवजी ४१ हजार २५ घरांच्या विक्रीबाबतची माहिती/कागदपत्रे सादर केली असल्यामुळे त्यानुषंगाने रक्कम परिगणित करुन त्यापैकी फक्त २८ टक्के रक्कम कंपनीस देण्याचा निर्णय सिडको (CIDCO) महामंडळाच्या स्तरावर घेण्यात आला. कंपनीस आतापर्यंत जीएसटीसह (GST) १२८ कोटी देण्यात आले आहेत, असे शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. (CIDCO)

(हेही वाचा – Uday Samant : भिवंडी महापालिकेतील अधिकाऱ्याच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत मागविणार; उदय सामंत यांचे आश्वासन)

‘या’ कंपन्यांना दिले कार्यादेश

मे. हेलिओस मीडियम बाजार प्रा. लि. आणि थॉटट्रेन्स डिझाईन्स प्रा. लि. संयुक्तरित्या सर्वात कमी दराची निविदा सादर केल्यामुळे त्यांना या कामासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच कंसोर्टियम किंवा संयुक्त भागीदारीमधील सर्व बोलीदारांची संसाधने, पात्रता आणि क्षमता यांचे जेव्हा एकत्रितपणे मूल्यांकन केले जाते तेव्हा ते निविदा दस्तऐवजात परिभाषित केल्यानुसार निकषांच्या संपूर्णतेशी सुसंगत असल्याचे विचारात घेतले जाते. त्यानुसार, सामान्यतः मूल्यमापनासाठी फक्त लीड बिडर/आघाडीची बोलीदार यांचा अनुभव आणि इतर बाबी विचारात घेतल्या आहेत. (CIDCO)

संयुक्त भागीदारीमधील आघाडीची बोलीदार कंपनी मे. थॉटट्रेन्स डिझाइन्स प्रा. लि. ही कंपनी सन २००७ मध्ये नोंदणीकृत झाली असल्यामुळे मूल्यमापन समितीद्वारे पात्र ठरवली गेली, अशी माहितीही शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. मे. हेलिओस मीडियम बाजार प्रा. लि. कंपनीची स्थापना सन २०१८ मध्ये झालेली असून तिला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना, मात्र एक कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या कंपनीला सीव्हीसी गाईडलाईन्स न पाळता काम देण्यात आले, हे खरे आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) वरील खुलासा केला आहे. (CIDCO)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.