BMC Budget 2024-25 Coastal Road : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, पंतप्रधानांच्या हस्ते होणार शिवजयंतीला लोकार्पण

गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचे काम मागील ११ वर्षांपासून नियोजित प्रकल्पातील टनेलच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाचे भूमिपुजनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

272
BMC Budget 2024-25 Coastal Road : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, पंतप्रधानांच्या हस्ते होणार शिवजयंतीला लोकार्पण

मुंबई महापालिकेचा सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्प (BMC Budget 2024-25 Coastal Road) अर्थात मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा एक मार्ग येत्या २० फेब्रुवारीपासून खुला केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या एका मार्गाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हा मार्ग खुला होणार आहे. तर संपूर्ण उर्वरीत मार्ग हा १५ मे २०२४ पर्यंत खुला केला जाईल असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी घोषित केले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयार)

१९ फेब्रुवारीला देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण –

मुंबई महापालिकेच्या सन २०२४ -२५चा अर्थसंकल्प (BMC Budget 2024-25 Coastal Road) सादर करताना इक्बालसिंह चहल यांनी सुमारे १३, ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह या १०.०८ किलोमीटर लांबीची एक मार्गिका १९ फेब्रुवारीला देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्यावर खुली केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काम अतिरिक्त आयक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून त्यांनी हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने चहल यांनी त्यांचे व त्यांच्या टिमचे कौतुक केले आहे.

(हेही वाचा – Predator Drones MQ 9-B : भारताला मिळणार ३१ प्रीडेटर ड्रोन; अमेरिकन काँग्रेसने दिली सौद्याला मंजुरी)

६२०० कोटी रुपयांचा प्रकल्प –

तसेच गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचे काम (BMC Budget 2024-25 Coastal Road) मागील ११ वर्षांपासून नियोजित प्रकल्पातील टनेलच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाचे भूमिपुजनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुमारे ६२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून सध्या या एवढ्या अंतराच्या प्रवासासाठी सव्वा तासाचा अवधी लागतो तो कालावधी आता १० ते १२ मिनिटांवर येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Coastal Road Inauguration : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये ?)

२०२८ – २९ मध्ये पहिली लेन सुरु होईल – इक्बालसिंह चहल

कोस्टल रोडला जाणाऱ्या वांद्रे ते वर्सोवा सागरी किनारा (BMC Budget 2024-25 Coastal Road) रस्त्यांचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून होत असून वर्सोवा ते मिरा रोड भाईंदर पर्यंतची कामे सहा भागांमध्ये केली जाणार आहे. या सहाही भागांच्रा कामांसाठी निविदा अंतिम करून कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यासर्व प्रकल्पाचा खर्च २४ हजार कोटी रुपये एवढा असून सन २०२८ – २९ मध्ये पहिली लेन सुरु होईल असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला आहे. (BMC Budget 2024-25 Coastal Road)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.