Predator Drones MQ 9-B : भारताला मिळणार ३१ प्रीडेटर ड्रोन; अमेरिकन काँग्रेसने दिली सौद्याला मंजुरी

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारतासोबत ३१ प्रीडेटर ड्रोन पुरवण्याचा करार केला आहे. यामध्ये भारतीय नौदलाला सर्वाधिक १५ ड्रोन्स मिळतील. त्याचबरोबर भारतीय सैन्य आणि हवाई दलाला प्रत्येकी ८ ड्रोन दिले जाणार आहेत.

220
Predator Drones MQ 9-B : भारताला मिळणार ३१ प्रीडेटर ड्रोन; अमेरिकन काँग्रेसने दिली सौद्याला मंजुरी

अमेरिकन काँग्रेसने भारताला ३१ शक्तीशाली प्रीडेटर ड्रोन (Predator Drones MQ 9-B) एमक्यू ९-बी चा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात यूएस स्टेट डिपार्टमेंटने प्रीडेटर ड्रोन बनवणाऱ्या ऍटॉमिक्स कंपनीला तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता भारताला अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवले आहे.

(हेही वाचा – Interim Budget 2024 : मालदीवच्या मदतीमध्ये कपात, अन्य देशांच्या अनुदानातही घट)

भारत आणि अमेरिका यांच्यात ३ अब्ज डॉलर्सचा करार –

भारताला मिळाणारे प्रीडेटर ड्रोन (Predator Drones MQ 9-B) हे शत्रूच्या गुप्तचर यंत्रणेला खीळ घालण्यास सक्षम आहेत. ते इतके शक्तिशाली आहेत की ते ४० हजार फूट उंचीवरून शत्रूवर लक्ष ठेवू शकतात आणि ४५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या बॉम्बसह उडू शकतात. त्यांच्यात आणखीही अनेक वैशिष्ट्ये आहेत. प्रीडेटर ड्रोनसाठी भारत आणि अमेरिका यांच्यात ३ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. त्यानुसार भारताला ३१ एमक्यू प्रीडेटर ड्रोन विकण्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारतासोबत ३१ प्रीडेटर ड्रोन (Predator Drones MQ 9-B) पुरवण्याचा करार केला आहे. यामध्ये भारतीय नौदलाला सर्वाधिक १५ ड्रोन्स मिळतील. त्याचबरोबर भारतीय सैन्य आणि हवाई दलाला प्रत्येकी ८ ड्रोन दिले जाणार आहेत.

(हेही वाचा – Hemant Soren: हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची पोलीस ईडी कोठडी, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही)

प्रीडेटर ड्रोनची वैशिष्ट्ये –

प्रीडेटर ड्रोन (Predator Drones MQ 9-B) यूएव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोनमध्ये क्षेपणास्त्रे तैनात केली जाऊ शकतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो शत्रूच्या ठिकाणाला अचूकपणे लक्ष्य करू शकतो. त्याचे दोन प्रकार आहेत. एक स्काय गार्गन आणि दुसरा सी (सी) गार्गन. याचा अर्थ ते हवाई आणि सागरी दोन्ही क्षेत्रांत सैन्याला बऱ्यापैकी लाभ देऊ शकतात. एमक्यू-९-बी ड्रोन (Predator Drones MQ 9-B) हवेत ३५ तास सतत उडू शकतो, ज्यामुळे तो शत्रूवर दीर्घकाळ नजर ठेवू शकतो.

(हेही वाचा – Paytm : 29 फेब्रुवारीनंतरही पेटीएम अॅप नेहमीप्रमाणे काम करत राहील – विजय शेखर शर्मा)

ड्रोनमध्ये स्वयंचलित टेक-ऑफ आणि लँडिंगची क्षमता –

प्रीडेटर ड्रोनची (Predator Drones MQ 9-B) वाहक क्षमता ५६७० किलो आहे आणि त्याची इंधन क्षमता २७२१ किलो आहे. प्रीडेटर ड्रोन ४० हजार फूट उंचीपर्यंत काम करू शकते. ते ४५० किलो वजनाच्या बॉम्बसह उडू शकते. हे ड्रोन इतके अत्याधुनिक आहेत की ते जमीन, समुद्र आणि हवेवर अतिशय प्रभावी आहेत. प्रीडेटर ड्रोनमध्ये स्वयंचलित टेक-ऑफ आणि लँडिंगची क्षमता देखील आहे आणि ते दिवस आणि रात्री दोन्ही चालवता येते. (Predator Drones MQ 9-B)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.