Coastal Road Inauguration : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये ?

Coastal Road Inauguration : १९ फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या फेजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमीटर मार्गाचे लोकार्पण

674
Coastal Road Inauguration : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये ?
Coastal Road Inauguration : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये ?

मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या (Coastal Road) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होणार आहे. (Coastal Road Inauguration)

मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.

(हेही वाचा – Hemant Soren: हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची पोलीस ईडी कोठडी, सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही)

१९ फेब्रुवारी रोजी वरळी (Worli) ते मरीन ड्राईव्ह (Marine Drive) या १० किलोमीटरच्या रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. १५ मेपर्यंत दोन्ही फेज सुरु होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे.

 वाहतूक कोंडी कमी होणार

या प्रकल्पामुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प २ भागांत विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे २ भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचे काम आधी हाती घेण्यात आले आहे.

12700 कोटी रुपये खर्च

सुरुवातीला मरीन ड्राईव्हपासून ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

(हेही वाचा – BMC Budget 2024 – 25 : मुंबई महापालिकेचा यंदा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प)

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल, तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर  इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे. (Coastal Road Inauguration)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.