BMC Budget 2024 – 25 : मुंबई महापालिकेचा यंदा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी शिक्षण खात्याचा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक मुंबई महापालिका प्रशासक चहल यांना सादर केले आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला.

2923
BMC Budget 2024 - 25 : मुंबई महापालिकेचा यंदा ५९,९५४.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा सन २०२४-२५ चा अंदाजित अर्थसंकल्प (BMC Budget 2024 – 25) आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी सादर केला. यावेळी ५९,९५४.७५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेने अर्थसंकल्पाचा आकडा १०.५० टक्क्यांनी वाढला आहे. तब्बल ३७ वर्षांनी महापालिकेत नियुक्त झालेल्या प्रशासकांनी सलग दुसऱ्या वर्षीही महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवला आहे. दरम्यान,विविध प्रकल्प हाती घेण्यात आल्याने महापालिका आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठीच सल्लागार नेमणार आहे.

(हेही वाचा – Jharkhand political crisis : धुक्यामुळे आमदारांच्या विमानांचे उड्डाण रद्द)

यामध्ये प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी शिक्षण खात्याचा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक मुंबई महापालिका प्रशासक चहल यांना सादर केले आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2024 – 25) प्रशासक चहल यांना सादर केला. या प्रसंगी आयुक्त सुधाकर शिंदे, अश्विनी जोशी, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, प्रमुख लेखापाल (वित्त) प्रदीप पडवळ, महापालिका सचिव संगीता शर्मा आदींसह महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

सलग दोन अर्थसंकल्प मांडणारे इक्बाल सिंह पाहिले प्रशासक ठरले आहेत –

मुंबई महापालिकेत तब्बल ३७ वर्षांनी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांनी प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प (BMC Budget 2024 – 25) सादर करण्याचा हक्क मागील वर्षी मिळवला होता. पण महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक न झाल्याने आगामी सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प मांडण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. एप्रिल १९८४ मध्ये द.म.सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५मध्ये जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प जाहीर केला.त्यामुळे सलग दोन अर्थसंकल्प मांडणारे ते पाहिले प्रशासक ठरले आहेत.

New Project 2024 02 02T125108.515
सलग दोन अर्थसंकल्प मांडणारे इक्बाल सिंह पाहिले प्रशासक ठरले

(हेही वाचा – Interim Budget 2024 : युपीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामन)

अर्थसंकल्पातून ‘या’ मागण्या प्रस्तावित करण्यात आल्या –

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना राबविण्याची घोषणा केली आहे, तर बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क रचनेबाबत अभ्यास करणे, बेस्टला ९२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दहिसर आणि मानखुर्द येथील महापालिकेच्या जकात नाक्याच्या जागेवर प्रस्तावित वाहतूक आणि व्यवसायिक केंद्र तसेच अतिरिक्त पॉईंट ५० एफएसआय मधून प्राप्त होणाऱ्या महसुलाच्या २५ ऐवजी ७५ टक्के तसेच फांजिबल एफएसआय मधून प्राप्त होणाऱ्या महसुलाच्या ५० टक्के ऐवजी ७० टक्के हिस्सा महापालिकेस मिळावा अशा प्रकारची मागणी प्रस्तावित केली आहे आणि याबाबत राज्य शासनाशी पाठपुरावा करण्यात येईल असे म्हटले आहे. याबरोबरच सागरी किनारा प्रकल्प यासारख्या मोठ्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली खर्चाची आवश्यकता लक्षात घेता आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (BMC Budget 2024 – 25)

(हेही वाचा – Traffic Police Control Room Threat Call : मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश, सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला तपास)

महसुली उत्पन्नाचे स्त्रोत

जकातीपोटी करावयाच्या भरपाईसाठी अनुदान सहाय्य :१३,३३१.६३ कोटी रुपये

मालमत्ता कर : ४९५० कोटी रुपये

विकास नियोजन खात्यापासून प्राप्ती : ५,८०० कोटी रुपये

गुंतवणूकीपासून प्राप्ती :२२०६.३० कोटी रुपये

जल आणि मलनि : सारण आकार : १९२३ कोटी रुपये

शासनाकडून अनुदाने :१२४८.९३ कोटी रुपये

पर्यवेक्षण आकार : १६८१.५१ कोटी रुपये

रस्ते व पूल यापासून प्राप्ती : ५०८.७४ कोटी रुपये

अनुज्ञापन खात्यापासून प्राप्ती 

रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये यापासून प्राप्ती :३३७.५२ कोटी रुपये

इतर प्राप्ती :४३३१.७२ कोटी रुपये 

(हेही वाचा – Chandrakant Patil : विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी)

तरतूद केलेली रक्कम

पाणी पुरवठा व मलनिःसारण : १३२१३.४५

आरोग्य अर्थसंकल्प: ७१९१.१३ कोटी रुपये

निवृत्तीवेतन निधी : ५५६१.०० कोटी रुपये

प्राथमिक शिक्षण : २४६१.९९कोटी रुपये

गलिच्छ वस्ती सुधारणा : ३४२.७७ कोटी रुपये

सुधार योजना : ५८३.७९ कोटी रुपये

विभाग आणि त्यासाठीची तरतूद

रस्ते विभाग : ३२०० कोटी रुपये
पूल विभाग : २९६० कोटी रुपये
पर्जन्य जलवाहिनी विभाग : १९३० कोटी रुपये
आरोग्य विभाग : १७१६.८५ कोटी रुपये
शिक्षण विभाग : ३४६७ कोटी रुपये
घनकचरा व्यवस्थापन :१०५५ कोटी रुपये

(हेही वाचा – N. srinivasan ED Raid : चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटसवर ईडीची धाड)

घनकचरा व्यवस्थापन मोठे प्रकल्प :२३० कोटी रुपये
उद्याने : १७८.५० कोटी रुपये
राणी बाग : ७४.३० कोटी रुपये
अग्निशमन दल : २३२ कोटी रुपये
मंड्या : १०५ कोटी रुपये

पाणी पुरवठा प्रकल्प :२४०० कोटी रुपये
पाणी पुरवठा विभाग : १०२० कोटी रुपये
मलनिःसारण प्रचलन विभाग : ५५७ कोटी रुपये
मलनिःसारण प्रकल्प :५०४५ कोटी रुपये

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प : २९०० कोटी रूपये

गोरेगांव मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) : १८७० कोटी रुपये

वांद्रे ते भाईंदर प्रकल्पl : २२० कोटी रुपये

घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प वेस्ट टू एनर्जी सह : २३० कोटी रुपये

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.