Interim Budget 2024 : युपीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

१० वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, लोकसभा निवडणुका काही महिने दूर असताना, सरकारने २०१४ च्या तुलनेत देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीतील फरक संसदेत श्वेतपत्रिकेसह सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

193
Interim Budget 2024 : युपीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. (Nirmala Sitharaman) निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी केंद्र सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निर्मला सीतारामन (Interim Budget 2024) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांचे सरकार वंदे भारत ट्रेनच्या बोगीप्रमाणे ४० हजार रेल्वे बोगी बनवेल. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात इतर अनेक मोठ्या योजनांचाही उल्लेख केला.

(हेही वाचा – One Avighna Park : ‘वन अविघ्न पार्क’च्या तळघरातील कचरा वर्गीकरण खोलीत सापडले मृत अर्भक)

युपीए आणि भाजपच्या काळातील अर्थव्यवस्थेतील बदल –

अशातच अंतरिम अर्थसंकल्पाचे (Interim Budget 2024) वाचन करत असतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाची चालू अर्थव्यवस्था आणि युपीए काळातील देशाची अर्थव्यवस्था याची तुलना केली, तसेच युपीएच्या काळातील अर्थव्यवस्थेची दुरवस्था श्वेतपत्रिकेतून मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही श्वेतपत्रिका पुढच्याच आठवड्यात मांडण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(हेही वाचा – Naxalist : एकट्या गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शासकीय आणि खासगी मालमत्तांचे किती नुकसान केले? जाणून घ्या आकडा)

नेमकं काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले. त्यापूर्वीच्या १० वर्षांच्या काळात काय झाले आणि त्यातून काय धडे घ्यायला हवे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे (Nirmala Sitharaman) अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, “मोदी सरकार स्थापन झाले त्यावेळी अर्थव्यवस्था टप्याटप्प्याने सुधारणे आणि शासन व्यवस्थेची घडी नीट बसविण्याची मोठी जबाबदारी सरकारवर होती. लोकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अतिशय आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी समर्थन उभे करणे, ही त्यावेळी काळाची गरज होती. ‘देश प्रथम’ या तत्त्वावर विश्वास ठेवून सरकारने हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. सरकारसमोरील संकटांवर मात करून, सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेला सातत्यशील विकासाच्या मार्गावर आणण्यात आले आहे,” असे सीतारामन म्हणाल्या. (Interim Budget 2024)

(हेही वाचा – रोहित पवारांची ED कडून साडेआठ तास कसून चौकशी; पुन्हा कधी होणार चौकशी?)

अर्थसंकल्प मांडतांना अर्थमंत्र्यांनी केलेल्या काही आकर्षक घोषणा –

१. देशाच्या भांडवली खर्चासाठी नवीन आर्थिक वर्षासाठी ११.१ लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ११.१ टक्क्यांची
वाढ झाली आहे.

२. नवीन टेक-सॅव्ही उद्योजकतेनं भारलेल्या तरुणांसाठी नवीन अर्थसहाय्य योजना. त्यासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद. या निधीतून तरुणांना कमी
व्याजदराने किंवा काही वेळा व्याजरहित कर्ज उपलब्ध करून देणार.

३. आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेचा फायदा आता अंगणवाडी आणि आशासेविकांनाही मिळणार.

४. गरोदर माता आणि नवजात अर्भकासाठी असलेल्या कल्याण योजनेला अधिक सर्वसमावेशक करणार. त्यासाठी नवीन योजना आणणार.

५. ‘लखपती दीदी’ योजनेचं उद्दिष्टं २ कोटी रुपयांवरून ३ कोटी रुपयांवर आणलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.