One Avighna Park : ‘वन अविघ्न पार्क’च्या तळघरातील कचरा वर्गीकरण खोलीत सापडले मृत अर्भक

मुंबईतील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखली जाणारे करीरोड येथील वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीच्या 'ए' व 'बी' अशा दोन विंग आहेत. प्रत्येक विंगमध्ये २२५ असे एकूण ४५० फ्लॅट आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर लॉबी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत.

353
One Avighna Park : 'वन अविघ्न पार्क'च्या तळघरातील कचरा वर्गीकरण खोलीत सापडले मृत अर्भक

करीरोड येथील वन अविघ्न पार्क (One Avighna Park) या उच्चभ्रू इमारतीच्या बी विंगच्या तळघरातील (Basement) कचरा वर्गीकरण खोलीत (Waste segregation room) स्त्री जातीचे मृत अर्भक (female fetus) मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करून हे अर्भक ताब्यात घेऊन पूर्व तपासणीसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हे अर्भक कुठल्या मजल्यावरून टाकण्यात आले याची चौकशी सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करत आहे.

(हेही वाचा – Bangladesh : बांगलादेशात विरोधी पक्षाकडून भारतविरोधी चळवळ)

मुंबईतील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखली जाणारे करीरोड येथील वन अविघ्न पार्क (One Avighna Park) या ६० मजली इमारतीच्या ‘ए’ व ‘बी’ अशा दोन विंग आहेत. प्रत्येक विंगमध्ये २२५ असे एकूण ४५० फ्लॅट आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर लॉबी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक मजल्यावर जीन्याजवळ कचरा टाकण्याकरिता एक खोली बनविण्यात आली असून, प्रत्येक मजल्यावरील कचरा त्या खोली मध्ये असणा-या दोन लोखंडी पाईपाव्दारे टाकला जातो. सदरचा कचरा एकत्र करण्यासाठी तळघरात (basement) कचरा वर्गीकरण खोली (Waste segregation room) बांधण्यात आली आहे. या खोलीत दोन्ही विंग मधील ओला व सुका कचरा पाईपाद्वारे गोळा केला जातो. या खोलीत कचऱ्याचे वर्गीकरण करून, त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यासाठी एका खाजगी कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटी कामगार दररोज या खोलीत गोळा होणारा कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावतात.

(हेही वाचा – Naxalist : एकट्या गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शासकीय आणि खासगी मालमत्तांचे किती नुकसान केले? जाणून घ्या आकडा)

बुधवारी (३१ जानेवारी) सकाळी कचरा वर्गीकरण करण्यासाठी आलेल्या तीन कंत्राटी कर्मचारी कचऱ्याचे वर्गीकरण (One Avighna Park) करीत असताना त्यांना एक नवजात अर्भक आढळून आले, त्याने तात्काळ ही माहिती कंत्राटदार आणि तेथे उपस्थित व्यवस्थापक यांना दिली. त्यांनी तळघरातील कचरा वर्गीकरण खोलीत पाहणी केली असता लोखंडी पाईपचे खाली कच-याच्या ढिगाऱ्यात एक स्त्री जातीचे नवजात अर्भक ज्याच्या तोंड लाल रंगाच्या कपड्याने गुंडाळलेल्या स्थितीत उताणे अवस्थेत आढळून आले. या अर्भकाची नाळ अर्धवट कापलेली दिसून आली. (One Avighna Park)

(हेही वाचा – Jharkhand political crisis : धुक्यामुळे आमदारांच्या विमानांचे उड्डाण रद्द)

हे अर्भक कचरा टाकण्यासाठी असलेल्या लोखंडी पाईपमधून खाली आलेले असावे असा अंदाज लावून व्यवस्थापकांनी काळाचौकी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीसांनी तेथे येऊन पाहणी केली असता हे अर्भक मृत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी मृत अर्भकाच्या मृत्युचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी ते के.ई.एम.रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल करून इमारतीच्या विंगच्या प्रत्येक मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. (One Avighna Park)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.