Newborn Baby Dumping In Mumbai: मुंबईत नवजात अर्भकाला फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ, एका महिन्यात सहा घटना

196
Newborn Baby Dumping In Mumbai: मुंबईत नवजात अर्भकाला फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ, एका महिन्यात सहा घटना
Newborn Baby Dumping In Mumbai: मुंबईत नवजात अर्भकाला फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ, एका महिन्यात सहा घटना

अनैतिक सबंधातून (Illicit relationships) जन्माला येणाऱ्या नवजात अर्भकांना (foetus) कचरा कुंडी, (dustbean) सार्वजनिक शौचालयात(public toilet) फेकले जात असल्याच्या घटनांमध्ये मागील वर्षभरापासून वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात या प्रकारच्या एका पाठोपाठ तीन घटना मुंबईत समोर आलेल्या आहेत. नवजात अर्भकांना फेकण्याच्या घटना केवळ झोपडपट्टीत ( slum pocket) घडत नसून याचे लोण उच्चभ्रूंमध्येही (high profile) पसरले असल्याचे नुकत्याच एका घटनेत समोर आले आहे. मुंबईत या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई शहरातील करीरोड येथील वन अविघ्न पार्क (one avighna park) या ६० मजली उच्चभ्रू इमारतीच्या ‘बी’ विंगच्या कचऱ्यात काळाचौकी पोलिसांना दोन दिवसांपूर्वी एक स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. हे अर्भक कोणी टाकले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज (cctv camera)तपासले जात आहे. दरम्यान आदल्याच दिवशी चारकोप (charkop)कांदिवली येथील एका नर्सरीमध्ये १० दिवसांच्या मुलीला एक जोडपे पुरून गेले होते. चारकोप पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे. रस्त्यावर फुगे विकणाऱ्या या जोडप्याने आजारपणाने मृत पावलेल्या मुलीच्या मृतदेहाची या पद्धतीने विल्हेवाट (disposal) लावल्याचे समोर आले.

२८ जानेवारी रोजी मालाड पूर्व येथे कुरार व्हिलेज पोलिसांना कचराकुंडीत एक स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. हे अर्भक फेकणाऱ्याचा शोध अद्याप लागलेला नाही तसेच ९ जानेवारी रोजी सायन पोलिसांना सायन रुग्णालयातील (sion hospital) आपत्कालीन विभाग या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयात (public toilet) स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले मुलं मिळून आले होते. या प्रकरणी सायन पोलिसांनी एका तरुणीला अटक केली होती. हे मूल अनैतिक संबंधातून जन्माला आल्यामुळे तिने शौचालयात टाकून दिले होते.

(हेही वाचा – Predator Drones MQ 9-B : भारताला मिळणार ३१ प्रीडेटर ड्रोन; अमेरिकन काँग्रेसने दिली सौद्याला मंजुरी)

माहीम पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल…

२३ ऑगस्ट रोजी प्रभादेवी (prabhadevi) आणि लोअर परळ (lower parel) स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर एका स्त्री जातीच्या नवजात बाळाचा मृतदेह रेल्वे पोलिसांना आढळला होता. बाळाची नाळ अजूनही जोडलेली असल्याने जन्मानंतर लगेचच बाळाला सोडून दिल्याचा पोलिसांना संशय होता. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. १२ जून रोजी मुंबईतील पवईजवळ एका कचराकुंडीत सुमारे १.४ किलो वजनाचे नवजात अर्भक टाकून दिलेले पोलिसांना आढळून आले होते. ३१ मे रोजी माहीम पोलिसांना मच्छी मार्केट क्लॉथ मार्केटजवळ एक नवजात मृत अर्भक आढळले होते. माहीम पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मुंबई शहरासह उपनगरात नवजात मृत अर्भक कचराकुंडी, शौचलयात सापडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होत असते; परंतु अनेक गुन्हे अद्याप ही उकल झालेली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लिव्ह अँड रिलेशनशिपचे प्रमाण वाढले…

उघडकीस येणाऱ्या गुन्ह्याच्या तपासात जन्माला येणारी बहुतांश मुले ही अनैतिक संबंधातून जन्माला आलेली असतात. अनैतिक संबंधातून जन्माला येणाऱ्या मुलांचा समाज स्विकार करणार नाही किंवा इभ्रतीच्या भीतीने या मुलांना कचराकुंडीत फेकले जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटना बहुतांश झोपडपट्टी परिसरात अधिक प्रमाणात आढळून येतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, विवाहापूर्वी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (live-in relationship)मध्ये राहण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये शहरामध्ये वाढले आहे. अनेक जोडपी लग्नाच्या बेडीत अडकण्यापेक्षा लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. या रिलेशनशिपमधून अनेक जणी गर्भवती राहतात. अशा पद्धतीने जन्माला आलेल्या अर्भकाला कचराकुंडी किंवा शौचालयात टाकण्यात येते. अनेक वेळा तर १५ ते १६ वयोगटातील मुली प्रेमप्रकरणातून गर्भवती राहतात, गर्भ पोटात वाढत आहे, याची कल्पनाही त्यांना नसते. जेव्हा कळते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. त्यातून जन्माला येणाऱ्या मुलाला टाकून देण्यात येते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.