BMC Budget 2024-25 : मुंबईकरांवर असा पाडला योजनांचा पाऊस

3527
BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच
BMC Project Cost : महापालिकेचे पायाभूत प्रकल्प दोन लाख कोटींचे, हाती मात्र केवळ ४६ हजार कोटीच

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी अशरक्ष: योजनांचा पाऊसच पाडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण, धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजना, महिलांसाठी सुरक्षा अभियान, महिला बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान आदी प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत.

शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२४-२५च्या अर्थसंकल्प मांडतांना विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुचित केल्याप्रमाणे विविध योजनांचा समावेश करताना चहल यांनी मुख्यमंत्री शुन्य प्रिस्क्रिप्शन धोरण हे १ एप्रिल २०२४ पासून महापालिकेच्या प्रमुखा रुग्णालयांमध्ये अमलात येईल, असे जाहीर केले आहे. यापुढे महापालिकेच्या कुठल्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचारांनंतर दिल्या जाणाऱ्या औषधांसाठी डॉक्टरांकडून चिठी दिली जाणार नाही. ही सर्व औषधे महापालिकेच्या (BMC) रुग्णालयातून उपलब्ध करून दिली जातील. यासाठी जेनेरिक औषधांचा पुरेसा साठा करून ठेवला जाईल. यासाठी १२०० कोटी रुपयांची आवश्यक असून ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘आपला दवाखाना’मध्ये ज्याप्रकारे मोफत औषधे देतो त्याच धर्तीवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जाणार आहे.

(हेही वाचा – Coastal Road Inauguration : कोस्टल रोडचा एक मार्ग १९ फेब्रुवारीपासून होणार सुरु, काय आहेत वैशिष्ट्ये ?)

दिव्यांगांना वर्षांतून दोनदा मिळणार महापालिकेचे अर्थसहाय्य

मुंबईत तब्बल ५९ हजार १५० दिव्यांग व्यक्ती असून त्यात ५० टक्क्यांपर्यंत दिव्यांग आणि त्यापेक्षा अधिक दिव्यांग अशा प्रकारे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार ५० टक्क्यापर्यंत दिव्यांग असलेल्या व्यक्तीला पिवळे कार्ड आणि त्यावरील दिव्यांगांना निळे कार्ड वितरीत करण्यात येणार असून येत्या १ एप्रिल २०२४ पासून यासर्व दिव्यांगांना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत (Dharmaveer Anand Dighe Disability Financial Aid Scheme) लाभ दिला जाणार आहे. त्यानुसार ज्या दिव्यांगाकडे पिवळे कार्ड असेल त्याला सहा महिन्यांनी सहा हजार रुपये तर निळे कार्ड असेल त्याला सहा महिन्यांनी १८ हजार रुपये एवढे अर्थसहाय्य केले जाईल,अशी घोषणा चहल यांनी केली.

महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप

मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा अभियान राबवले जाणार असून यासाठी एक ॲप विकसित केले जाणार आहे. यासाठी ॲपद्वारे महिलांना कुठल्याही मुंबईतील कुठल्याही ठिकाणी असल्यास सुरक्षा पुरवली जाणार असून यासाठी १०० निधीची तरतूद केली आहे.

महिला बचत गटांना वर्षाला १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

मुंबईतील महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता प्रत्येक बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. मुंबईत सुमारे १६०० महिला बचत गट असून प्रत्येक बचत गटांमध्ये १० ते १५ महिलांचा समावेश असतो. यासाठी आता १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आह. या महिला बचत गटांमध्ये तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी २५० कोटी रुपयांची मदत जेंडर बजेट अंतर्गत करण्यात आली आहे.

माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांकरीता आर्थिक सहाय्य योजना

माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या १०० विद्यार्थ्यांकरीता महापालिकेच्या वतीने पुढील पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी २५ हजार रुपये किंवा महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्काची रक्कम महापालिका अदा करेल. ही योजना मार्च २०२४ पासून लागू राहिल.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयार)

महापालिका सफाई कामगारांच्या पाल्यांनाही

मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या पाल्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले असतील अशा अधिक गुण मिळवाऱ्या पहिल्या १०० पाल्यांकरीता मार्च २०२४ पासून पुढील पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी २५ हजार रुपये किंवा महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्काची रक्कम महापालिका अदा करेल.

वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेसाठी

याबरोबरच महापालिका सफाई कामगारांच्या पाल्यांना वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेच्या तयारीकरीता खाजगी शिकवणीसाठी प्रति विद्यार्थी एकदाच ५०,००० रुपये इतके आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

एमपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मिळणार एवढे अर्थसाहाय्य

तसेच राज्य किंवा केंद्र शासनाच्या सकरकारी नोकरीसाठी पूर्व परीक्षेच्या तयारीकरता खासगी शिकवणीसाठी प्रति विद्यार्थी एकदाच ५० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. (BMC Budget 2024-25)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.