Bihar Caste Census Survey : बिहारच्या जातनिहाय जनगणनेवर भाष्य करणार नाही – सर्वोच्च न्यायालय

24
Bihar Caste Census Survey : बिहारच्या जातनिहाय जनगणनेवर भाष्य करणार नाही - सर्वोच्च न्यायालय

बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातनिहाय जनगणनेची (Bihar Caste Census Survey) आकडेवारी जाहीर केली. याविरोधात आज म्हणजेच मंगळवार ३ ऑक्टोबर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ती न्यायालयाने मान्य केली आहे. मात्र, या प्रकरणावर सध्या भाष्य करणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, आम्ही त्याच वेळी तुमचा युक्तिवाद ऐकू असे न्यायालयाने स्पष्ट केले.

याचिकाकर्त्याच्या वकिलाचे म्हणणे आहे की, बिहार (Bihar Caste Census Survey) सरकारने यापूर्वी जात जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करू नका असे सांगितले होते.बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये ९ पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री (Bihar Caste Census Survey) सचिवालयाच्या संपर्क कक्षात दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे. यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांना जातीनिहाय जनगणनेच्या आकडेवारीची माहिती दिली जाणार आहे. यापूर्वी जनगणना जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जातीवर आधारित जनगणना ९ पक्षांच्या मताने केल्याचे सांगितले होते. सोमवारी एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, सर्व बाबी सर्व पक्षांसमोर ठेवल्या जातील.

(हेही वाचा – जातीनिहाय जगणनेच्या मुद्द्यावर PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर जोरदार प्रहार; म्हणाले…)

बिहार (Bihar Caste Census Survey) सरकारने २ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केलेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार बिहारची लोकसंख्या १३ कोटी ७ लाख २५ हजार ३१० आहे. त्यात २ कोटी ८३ लाख ४४ हजार १६० कुटुंबे आहेत. ज्यामध्ये अत्यंत मागासवर्गीय ३६ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) २७ टक्के आहे. यादव जातींमध्ये सर्वाधिक १४.२६ टक्के आहेत. ब्राह्मण ३.६५ टक्के, राजपूत (ठाकूर) ३.४५ टक्के असून सर्वात कमी संख्या कायस्थांची ०.६० टक्के इतकी आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.