Increase In Epidemics : मलेरिया-डेंग्युची साथ वाढतेय, तापावर स्वत:हून उपचार करू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

22
Increase In Epidemics : मलेरिया-डेंग्युची साथ वाढतेय, तापावर स्वत:हून उपचार करू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Increase In Epidemics : मलेरिया-डेंग्युची साथ वाढतेय, तापावर स्वत:हून उपचार करू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

सध्या डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे नवीन साथीच्या आजाराचा धोका (Increase In Epidemics) निर्माण झाला असून हा आजार कोरोनापेक्षा सात पटीने जास्त धोकादायक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला ‘X’असे नाव दिले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते , डिसीज ‘X’ (Disease ‘X’) हा झुनोटिक रोगाशी संबंधित असू शकतो. जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून हा संसर्ग मानवांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे; कारण साधा ताप आला तरी त्यानंतर जाणवणारा अशक्तपणा बराच काळ टिकतो. यामुळे डेंग्यू, टायफाइड, मलेरिया, स्वाइन फ्लू या साथी सध्या वेगाने वाढत आहेत. यामध्ये तापाचे रुग्ण जास्त आहेत. काही राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहे. याशिवाय दिल्ली, एनसीआरपासून पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडपर्यंत डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.

(हेही वाचा  – CM Eknath Shinde : मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट होणार)

घरगुती उपचार करू नका (Home remedies)
– ताप आल्यास रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला, असे करू नका. घरगुती उपचार करू नका. डॉक्टरांनी डेंग्युचे निदान झाल्यानंतर स्वत:हून उपचार करणे टाळा.

– डेंग्यूमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी प्लेटलेट्सची पातळी अचानक कमी होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही रुग्ण सौम्य ताप आल्यास घरगुती उपचार करतात. यामुळे रुग्णाच्या स्थितीत सुधारणा होत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

‘ही’ लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करू नका …
ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, जॉइंट पेन, भूक न लागणे अशी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल ?
– दुधी भोपळ्याच्या रसात मध मिसळून प्या.
– नाश्त्यात डाळींब, अंजीर खा आणि फळांचा आहारात समावेशक करा.
– प्लेटलेट्स वाढण्यासाठी उपाय करा.
– गव्हाच्या पानांचा रस (व्हिटग्रास) प्यावा.
– कोरफडीचा रस प्या.
– हळदीचे दूध प्या.
– बदाम, अक्रोड खा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.