ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडची Boxing स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

31

जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे आयोजित ग्रामीण जिल्हा स्तरीय Boxing या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या (वयोगट १४, १७ व १९ वर्षांखालील संघामधून) सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन १५ सुवर्ण, ७ सिल्वर असे २२ पदके प्राप्त केले, तर या विद्यार्थ्यांनी पदक मिळवून विभागस्तरीय स्पर्धांसाठी या सर्व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

२ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे आयोजित ग्रामीण जिल्हास्तरीय Boxing या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामधून सहभागी झालेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करून पुन्हा एकदा जिल्हास्तरीय स्पर्धांवर आपले वर्चस्वव प्रस्तापित केले आहे. या साठी स्कुलचे Boxing या खेळाचे प्रशिक्षक दीपेश धाडवे, संदेश गपाट यांनी अल्पावधीत या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करुन घेतली होती. महाराष्ट्र मिलटरी स्कूल मुरबाडच्या संघाने मिळविलेल्या यशाबद्दल या शाळेचे विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाटील,  कार्यवाह रणजित सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर, हॉकी प्रशिक्षक राजेंद्र तिवारी, सर्व क्रिडा विभागातील प्रशिक्षक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

(हेही वाचा जातीनिहाय जगणनेच्या मुद्द्यावर PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर जोरदार प्रहार; म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.