Earth Quake : दिल्ली एनसीआरला भूकंपाचे धक्के

27

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात मंगळवार, ३ आॅक्टोबर रोजी भूकंपाचे Earth Quake तीव्र दोन धक्के जाणवले. पहिला धक्का दुपारी 2.15 मिनिटाला जाणवला तर दुसरा धक्का दोन वाजून 51 मिनिटाला आला. दुस—या आलेल्या धक्क्याची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल एवढी होती. मात्र, कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

देशाची राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचा Earth Quake धक्का जाणवला. मागील काही दिवसांपासून उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दुपारी आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. याआधी नेपाळमध्ये दुपारी २.२५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्याची तीव्रता ४.६ मोजण्यात आली होती. दिल्ली, यूपीसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या जूनमध्येही जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

(हेही वाचा कर्नाटक सरकार म्हणते, आम्ही अल्पसंख्यांकांच्या पाठिशी; BJP चा काँग्रेसवर हल्लाबोल)

गेल्या काही काळापासून भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि भूतानच्या डोंगराळ भागात वारंवार भूकंप Earth Quake होत आहेत. विशेषत: हिमालय पर्वतरांगांमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यासंदर्भात आयआयटी कानपूरच्या संशोधनात मोठा दावा करण्यात आला आहे. यानुसार भारतातील हिमालयीन राज्यांमध्ये कधीही विनाशकारी भूकंप येऊ शकतो. हा भूकंप 1505 आणि 1803 मध्ये झालेल्या भूकंपांसारखा असू शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

भूकंप Earth Quake येण्यामागचे कारण असे की, हिमालय पर्वतरांगातील टेक्टोनिक प्लेट अस्थिर झाली आहे. त्यामुळे असे भूकंप दीर्घकाळ होत राहतील. यावेळी भूकंप होण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. हे धक्के हिमालय पर्वतरांगांवर येतात. जम्मू आणि काश्मीर, लडाख, नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या भूकंपाचा प्रभाव कधी कधी दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्येही दिसून येतो. आयआयटीकडून भूकंपाचा अभ्यास केला जात आहे. त्यांच्यानुसार, भारताच्या हिमालय पर्वतरांगात मोठ्या भूकंपाची भीती आहे. नेपाळ, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या हिमालयीन रांगेत मोठा भूकंप येऊ शकतो, अशी शंका त्यांनी अनेकदा वर्तविली आहे. या भूकंपाची तीव्रता 7.8 ते 8.5 दरम्यान राहू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.