Govandi Crime : बेकायदेशीर नर्सिंग होम मध्ये सुरू होते अर्भक विक्रीचे रॅकेट

68
Govandi Crime : बेकायदेशीर नर्सिंग होम मध्ये सुरू होते अर्भक विक्रीचे रॅकेट
Govandi Crime : बेकायदेशीर नर्सिंग होम मध्ये सुरू होते अर्भक विक्रीचे रॅकेट

गोवंडीतील एका नर्सिंग होम मध्ये नवजात अर्भकाची बेकायदेशीररित्या विक्री करणारे एक रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. या प्रकरणात पाच महिलांना अटक करण्यात आली असून त्यात एक बोगस डॉक्टर महिलेचा समावेश आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी विक्री करण्यात येणारे पुरुष जातीचे अर्भक ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या पाचही महिलांविरुद्ध कलम ३७०, ३४ भा. दं. वि. सह कलम ८१ व ८७ बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सह कलम ३३ व ३६ महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनयम १९६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. (Govandi Crime)

गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलीया लॉरेन्स फर्नाडीस, सायराबानो नबीउल्ला शेख व रिना नितीन चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सायराबानो ही बोगस डॉक्टर असून गोवंडीतील रफिक नगर मध्ये रहेमानी नावाचे बेकायदेशीर नर्सिंग होम चालवत होती. ज्युलियो ही या रॅकेटची प्रमुख असून तिच्या इशाऱ्यावर हे रॅकेट चालविण्यात येत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. गोवंडी रफिक नगर येथील रहिमानी नर्सिंग होम या ठिकाणी एका नवजात अर्भकाची पाच लाख रुपयात विक्री होणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. रविंद्र रणशेवरे, पोनि फरीद खान (गुन्हे) व पोउनि शरद नाणेकर, विजयसिंह देशमुख, अनिल बांगर, अजय गोल्हार, अमर चेडे, सुरज खेतल, पूजा सलादे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोवंडीच्या रफिक नगर मधील रहिमानी नर्सिंग होम या ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीररित्या नवजात अर्भकाची होणारी विक्री थांबवून बोगस डॉक्टर सायरबानो सह पाच महिलांना अटक करण्यात आली. (Govandi Crime)

(हेही वाचा – कर्नाटक सरकार म्हणते, आम्ही अल्पसंख्यांकांच्या पाठिशी; BJP चा काँग्रेसवर हल्लाबोल)

या महिलांच्या ताब्यातून नवजात अर्भकाची सुटका करण्यात आली आहे, या पुरुष जातीच्या नवजात अर्भकाची ५ लाख रुपयात विक्री करण्यात येणार होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी मुले विक्री करण्याचे एक मोठे रॅकेट चालवत होते. फुटपाथवर राहणाऱ्या तसेच गरीब गर्भवती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जन्माला येणारे मुलाची विक्री करण्यासाठी तयार करण्यात येत होते, त्यानंतर या गर्भवती महिलेला रहिमानी नर्सिंग होम मध्ये आणून त्यांची डिलिव्हरी करून त्या मुलांची विक्री मुले न होणाऱ्या श्रीमंत घरातील दाम्पत्यांना ५ ते ८ लाख रुपयांना त्यांची बेकायदेशीर विक्री करण्यात येत होती. (Govandi Crime)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर अर्भक विक्री रॅकेट मध्ये श्रीमंत दाम्पत्याकडून स्त्री जातीच्या अर्भकाची म्हणजेच मुलींची मोठी मागणी होती, या मागणीनुसार स्त्री अर्भकाच्या विक्रीचा दर ७ ते ८ लाख रुपयांपर्यत होता तर पुरुष जातीचे अर्भक ३ ते ५ लाख रुपयात विक्री होत होते. अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टर सायराबानो नबीउल्ला शेख आणि ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस हे सराईत असून त्यांच्यावर यापुर्वी अशाच प्रकारचे ०६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सायराबानो हिचे शिक्षण दहावी पर्यंत झाले असून ती रेहमानी नावाचे नर्सिंग होम चालववुन स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि शरद नानेकर करीत आहेत. (Govandi Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.