Bhanudas Patil : कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास पाटील हुतात्मा, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

166
Bhanudas Patil : कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास पाटील हुतात्मा, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhanudas Patil : कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास पाटील हुतात्मा, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कुसुंबा येथील सैन्य दलात कार्यरत भानुदास पाटील (Bhanudas Patil) (५५) यांना गुजरात राज्यातील भुज येथे कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर रविवारी, (३१ डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी जवान भानुदास पाटील हे भारतीय सैन्य दलातील भुज येथील १२४९ डीएससी (डिफेन्स सिक्युरिटी कॅम्प) प्लाटून ७५ इन्फेंट्री ब्रिगेड येथे सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना जवान भासुदास पाटील यांचा शनिवारी (३० डिसेंबर) रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी कुसुंबे गावी आणण्यात आले. फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन ‘अमर रहे…,अमर रहे…,वीर जवान भानुदास पाटील अमर रहे’, या घोषणेसह भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत होते.

(हेही वाचा – Submarine Project : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार; वैभव नाईक यांचा आरोप.. काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे )

हुतात्मा भानुदास पाटील यांना राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबार करून त्यांना मानवंदना दिली. पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून त्यांना साश्रू नयनाने निरोप दिला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.