Submarine Project : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार; वैभव नाईक यांचा आरोप.. काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

Submarine Project : पाणबुडी प्रकल्प आपल्याच राज्याचा आहे, तो राज्याबाहेर जाणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी माझी या विषयावर चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

194
Submarine Project : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार; वैभव नाईक यांचा आरोप.. काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
Submarine Project : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार; वैभव नाईक यांचा आरोप.. काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

राज्यातून आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. (Submarine Project) सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल, अशी भीती वैभव नाईक यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तो प्रकल्प महाराष्ट्रात रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – KEM hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन)

ही महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे…

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी आरोप केला की, २०१८ मध्ये पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्र विभागाच्या पर्यटन खात्याने सिंधुदुर्गात आणला होता. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असतांना त्या प्रकल्पाला निधीची तरतूद केली होती. आता या प्रकारचे चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा गुजरात (Gujarat) शासन आणि केंद्र सरकारचा डाव आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असतांना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात वेदांता फॉक्सकॉन कंपनी (Vedanta Foxconn Company) गुजरातला गेल्यापासून आगपाखड करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

(हेही वाचा – Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार)

प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, पाणबुडी प्रकल्प आपल्याच राज्याचा आहे, तो राज्याबाहेर जाणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी माझी या विषयावर चर्चा झाली आहे. दीपक केसरकर इथे माझ्यासोबतच आहेत.

‘विरोधकांच्या काळात कामे ठप्प होती, त्यामुळे त्यांना आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक हा सर्वांत लांब समुद्र पूल

मुंबईहून रायगडला जाण्यासाठी आज २ तास लागतात; पण हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर केवळ १५ ते २० मिनिटांत रायगडला पोहोचता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. हा गेमचेंजर प्रकल्प असून वेळेची बचत, इंधनाची बचत आणि पर्यावरणासाठी पूरक असल्याचेही त्यांनी म्हटले. समृद्धी महामार्ग, एमटीएचएचल, मेट्रो किंवा तत्सम प्रकल्प थांबवण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ गती दिली, त्यामुळे ही कामे जोमाने सुरू असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.