Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार

123
Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार
Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार

नवीन पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक घडावेत यासाठी, पक्षी अभ्यासात रुची दाखविणारे, शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘होप’ या संस्थेकडून ‘उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक’ व ‘उदयोन्मुख पक्षिमित्र’ असे २ पुरस्कार दरवर्षी दिले जातात. ठाणे येथील हियर ऑन प्रोजेक्ट एनव्हार्नमेंट अर्थात होप नेचर ट्रस्ट (HOPE)या संस्थेतर्फे प्रायोजित महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेकडून (Hope Nature Trust Award) नवोदित पक्षीमित्रांना पक्षीमित्र संमेलनामध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

या पुरस्कारासाठी पक्षी निरीक्षण व पक्षी अभ्यास या क्षेत्रात नव्याने सुरुवात करून उत्कृष्ट कार्य करून आदर्श निर्माण करणाऱ्या तरुण पक्षी निरीक्षकांची निवड करण्यात येते. यावर्षीचा उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक पुरस्कार अर्णव अमरेंद्र पटवर्धन, डोंबिवली यांस जाहीर करण्यात आला. तो वयाच्या ७व्या वर्षापासून पक्षी निरीक्षण करत आहे. हा पुरस्कार २० वर्षांपेक्षा लहान वय असलेल्या विद्यार्थ्यास दिला जातो. अर्णव इयत्ता ९वीमध्ये शिकत असून पक्षी निरीक्षण करत आहे. त्याने पक्षीविषयक अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. पक्षी निरीक्षणावर आधारित अनेक भाषणे व प्रेझेंटेशन देऊन पक्षी निरीक्षणाविषयी जनजागृती करत आहे तसेच ‘उदयोन्मुख पक्षीमित्र पुरस्कार’ सौरभ अनिल महाजन, वरणगाव, जि. जळगाव यांस जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार २८ वर्षापेक्षा लहान वय असलेल्या तरुणास दिला जातो. पक्षी तसेच जैवविविधता अभ्यास व नोंदणी या विषयांमध्ये सौरभला विशेष रुची असून तो याच विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. आजवर अनेक पक्षी नोंदणी कार्यक्रमात सहभाग घेतलेला असून तो चातक नेचर संवर्धन संस्थेसोबत अगदी लहानपणापासून हतनूर धरण येथील पक्षीनिरीक्षण कार्यक्रमात सहभागी असतो. तो पक्षी आणि फुलपाखरे अभ्यास कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणूनसुद्धा काम करतो.

(हेही वाचा –Israel Embassy Blast Case: इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे हस्तांतरित )

“उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक” व “उदयोन्मुख पक्षिमित्र” या पुरस्कारांसाठी प्रत्येकी रु. २५००/- इतकी रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करून अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या पुरस्कारांचे वितरण ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात सांगली येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.