India Alliance : नव्या वर्षात इंडी आघाडी फुटणार ?; काय म्हणाले रवी राणा…

India Alliance : चर्चा जागावाटपापर्यंत गेल्या असतांना आघाडी एकसंध रहाणार कि आघाडीत बिघाडी होणार, हे नव्या वर्षात पहायला मिळणार आहे. 'महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील', असा दावा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे.

193
India Alliance : नव्या वर्षात इंडी आघाडी फुटणार ?; काय म्हणाले रवी राणा...
India Alliance : नव्या वर्षात इंडी आघाडी फुटणार ?; काय म्हणाले रवी राणा...

इंडी आघाडीने (India Alliance) आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) आगामी निवडणुकांच्या जागावाटपाविषयी चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. चर्चा जागावाटपापर्यंत गेल्या असतांना आघाडी एकसंध रहाणार कि आघाडीत बिघाडी होणार, हे नव्या वर्षात पहायला मिळणार आहे. ‘महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील’, असा दावा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे.

(हेही वाचा – NIA ची वर्षभरात 114 जिहाद्यांवर कारवाई; विविध प्रकरणांत 625 जणांना अटक)

महाविकास आघाडीत फक्त काँग्रेस रहाणार ?

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे (Rammandir Ayodhya) उद्घाटन होणार आहे. राममंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील, असा दावा रवी राणा यांनी ३१ डिसेंबर रोजी केला आहे.

देशातील अनेक पक्ष आज एकत्र झाले आहेत. अनेक पक्ष संभ्रमावस्थेत आहेत. त्यानंतर अनेक पक्ष पंतप्रधान मोदींसोबत येतील, असे रवी राणा यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही रवी राणा यांनी केलेला दावा खरा ठरला होता. ‘अजित पवार हे भाजपला (BJP) पाठिंबा देतील’, हे रवी राणा यांनी पूर्वीच वर्तवले होते.

(हेही वाचा – Hope Nature Trust Award: ३६व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात अर्णव पटवर्धन आणि सौरभ महाजन यांचा सत्कार)

जागावाटपाचा तिढा

दरम्यान, ‘इंडी’ आघाडीच्या (India Alliance) राज्यातील लोकसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उबाठा गटाने निर्णय होण्याआधीच राज्यातील 48 पैकी 23 जागांवर लढण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. हाच प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी धुडकावून लावला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ‘इंडी’ आघाडी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करून समसमान चार पक्षांनी 12-12 जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव ठेवला आहे.

समसमान वाटप हे आजवरच्या आघाडीच्या बैठकांमधील सूत्र नव्हते. उमेदवार जिंकून येण्याची सर्वाधिक क्षमता आहे, तो उमेदवार, सगळ्यांनी मिळून द्यायचा, हा ‘इंडी’ आघाडीचा फाॅर्म्युला आहे. जागावाटपाविषयी आतापासूनच टोकाचे मतभेद दिसून येत आहेत.

(हेही वाचा – NIA ची वर्षभरात 114 जिहाद्यांवर कारवाई; विविध प्रकरणांत 625 जणांना अटक)

अजून एक पक्ष सहभागी होणार ?

सध्या ‘इंडी’ आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल (राजद) यांसारख्या पक्षांचाही या आघाडीत समावेश आहे. बहुजन समाज पार्टीने (Bahujan Samaj Party, बसपा) मात्र अद्याप आघाडीत प्रवेश केलेला नाही. मात्र आता मायावती यांच्यावरही आघाडीत सहभागी होण्यासाठी पक्षांतर्गत दबाव येत आहे.

एकंदर राजकीय घडामोडी पहाता येत्या नववर्षात आघाडी टिकणार कि आघाडीत बिघाडी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (India Alliance)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.