शालेय विद्यार्थ्यांसाठीची विशेष ‘बेस्ट’सेवा अद्याप बंद

105

शालेय बस भाड्याच्या दरात अलिकडेच २० टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला कात्री लागली आहे. यासोबतच बेस्ट उपक्रमाने सुद्धा विद्यार्थ्यांसाठी असणारी विशेष बससेवा अद्याप सुरू केलेली नाही, यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. कोरोनाकाळाआधी बेस्ट उपक्रमाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा दिली जात होती. यामध्ये पालक, शाळा पुढाकार घेऊन बेस्ट उपक्रमाकडे अर्ज करत होते. यानंतर सकाळी व संध्याकाळी निश्चित केलेल्या वेळेमध्ये ही विशेष बससेवा दिली जायची. परंतु यंदाच्या वर्षी शाळा सुरू झाल्यानंतरही बेस्टकडून विशेष बससेवा सुरू करण्यासंदर्भात हालचाली झालेल्या नाहीत.

( हेही वाचा : ‘बेस्ट’कडून विद्यार्थ्यांना सवलतीत ‘बसपास’! जाणून घ्या दर)

शालेय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्याबाबतच्या सूचना

शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमातर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना बसगाड्यांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याबाबतच्या सूचना देखील आलेल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आवश्यकता भासल्यास अतिरिक्त बसगाड्यांची व्यवस्था देखील करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेस्टची सुविधा घेण्यासाठी सहा महिन्यांचे पैसे पालकांना उपक्रमाकडे भरावे लागतात. यात सहा महिन्यांचे चार ते पाच हजार रुपये आकारले जातात. तर खासगी शालेय बससाठी तीच रक्कम दहा ते पंधरा हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे पालकांना बेस्ट उपक्रमाची सेवा ही परवडते म्हणूनच लवकरात लवकर शालेय विद्यार्थ्यांसाठी ही विशेष बससेवा सुरू करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

सध्या बेस्टने शालेय विद्यार्थ्यांना बसपासमध्ये सवलत दिली आहे

  • इयत्ता ५ वी पर्यंत रु.२००/-
  • इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत रु.२५०/-
  • इयत्ता ११ वी १२ वी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता रु.३५०/-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.